नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली / प्रतिनिधी – हवाई दलातील मोहिमा पार पडताना अंमलबजावणीत समन्वय साधणे गरजेचे असते. यासाठी सतत चर्चा सत्र होवून सैन्याला मार्गदर्शन मिळणे महत्वाचे असते. यासाठी भारतात नुकतीच एक परिषद पार पडली. हवाई दलाच्या पश्चिम विभागाच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीच्या सुब्रतो पार्क येथे त्रि- सेवा कमांडर्स प (टीएससीसी)-2023 (पश्चिमी समूह) ही परिषद भरली होती. या दोन दिवसीय परिषदेचे आयोजन हवाई दलाचे पश्चिम विभागप्रमुख एअर मार्शल पीएम सिन्हा यांनी केले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
परिषदेत अधिकाऱ्यांनी सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. हिताच्या क्षेत्रात मोहिमांसाठीची सज्जता आणि मोहीम अंमलबजावणीत समन्वय वाढवण्याच्या मार्गावर यावेळी चर्चा करण्यात आली. आपल्या सीमांची अखंडता कायम राखणे आणि धोके कमी करण्यावरही चर्चा झाली. सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चा आणि विचारांची मुक्त देवाणघेवाण देखील झाली.