Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
चर्चेची बातमी पर्यावरण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वृक्ष गणना सुरु

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या उदयान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत दिनांक 13/06/2023 वृक्ष गणनेस सुरुवात करण्यात आली आहे

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण अधिनियम1975च्या तरतुदीनुसार ही वृक्ष गणना नियमित वृक्ष गणनेपेक्षा वेगळी होणार आहे. या वृक्ष गणनेसाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे, यामध्ये मोबाईल ॲप सॉफ्टवेअर आणि डॅशबोर्डचा अंतर्भाव असेल.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक झाड, सार्वजनिक जागा, मोकळया जागा, औदयोगिक परिसर इतकेच नव्हे तर खाजगी मालमत्तेतील प्रत्येक झाडाची गणना करुन रेकॉर्ड ‍जतन केले जाणार आहे. यामध्ये 50 वर्षांहुन जास्त जुन्या वृक्षाची म्हणजेच हेरीटेज वृक्ष यांची देखील गणना केली जाणार आहे. तसेच कुठे वृक्ष लागवड करणे शक्य आहे हे या माध्यमातून पाहिले जाणार आहे. तसेच भविष्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील वृक्ष संपदा, महापालिका परिसरात कोणत्या प्रकारची किती झाडे आहेत याची माहिती प्राप्त होणार आहे.

या वृक्ष गणनेची अंतिम माहिती आकडेवारी ही प्रामुख्याने महापालिका क्षेत्रातील महाविदयालयांसाठी विशेषत: वनस्पती शास्त्र शिकविणा-या महाविदयालयांमधील अभ्यासकांसाठी माईल स्टोन ठरणार आहे. महापालिकेने मागील वृक्ष गणना 2007 साली केली होती आता हीच वृक्ष गणना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुनकेली जाणार आहे, महापालिका क्षेत्रात सुमारे 6 लाख झाडे अपेक्षित असून साधारण पणे 15 महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती महापालिकेचे मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव यांनी माध्यमांना दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X