नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
मुंबई/प्रतिनिधी – मुंबई मध्ये वाढते वायू आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होत आहे. वाढत्या वायू आणि ध्वनी प्रदुषणाला आळा घालण्यासाठी मोटरसायकलीचे 584 सायलेन्सर वाहतुक पोलिसांनी जप्त केले आहेत.मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेने 20 हजार 946 PUC नसलेल्या मोटार सायकलवर कारवाई केली आहे.
ज्या वाहन चालकांनी वाहनांमध्ये अनधिकृत रित्या सायलेन्सर बदलले आहेत, त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात आली आहे.एकूण 584 सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. तर अशा वाहनांकडून दंड पोलिसांनी वसूल केला आहे.असे अनधिकृत सायलेन्सर कोणी वापरू नये, तसेच कटआऊट मॉडीफाय सायलेन्सर देखील कोणी वापरू नये, असे वाहतूक नियंत्रण शाखेमार्फत आवाहन करण्यात आले आहे.प्रदुषण कमी कसे होईल याची खबरदारी आम्ही घेत आहोत, अशी माहिती प्रवीण पडवळ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिली आहे.