नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये लिप्टसाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून एका सहा वर्षीय मुलाचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना डोंबिवलीतील सांगर्ली परिसरात घडली आहे. वेदांत जाधव असे या मुलाचे नाव असून पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. काही महिन्यात अशा प्रकारची दुसरी घटना आहे.
डोंबिवली पूर्व भागातील सांगर्ली परिसरात एका बहुमजली इमारतीचे काम सुरु आहे. या इमारतीमध्ये लिफ्ट बसविण्याकरीता खड्डा खोदण्यात आला होता. या परिसरात राहणारा एक सहा वर्षीय मुलगा वेदांत जाधव या खड्डय़ात पडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मानपाडा पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत. मुलाचा मृत्यू कधी आणि कशामुळे झाला आहे. हे पोलिस तपासाअंती समोर येणार आहे. काही महिन्यापूर्वीच सागाव परिसरात असे एक बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये लिफ्टसाठी खोदलेल्या खड्डय़ात पडून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेमध्य पोलिस तपास करतील मात्र घटनाग्रस्त इमारत बेकायदा कि अधिकृत याविषयीही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

प्रशासननाने जिथे जिथे अशी बांधकामे चालू आहेत त्या ठिकाणी लक्ष घालून तेथील विकासाला इमारतीची कामे चालू असताना अशा दुर्घटना घडू नये म्हणून काय काळजी घेतली गेली आहे का? याची योग्य ती अमलबजावणी झाली आहे का? हे पाहणे गरजेचे आहे.ज्या निष्पपाप बालकाचा बळी घेला आहे . त्याच्या कुटुंबावर किती मोठा दुखाचा डोंगर उभा राहीला आहे ते फक्त तेच कुटुंब सांगू शकते. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.