नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – देशभरातून लाखों लोक मुंबईत नोकरी करण्यासाठी येतात. त्यामुळे लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही अफाट आहे. धावत्या लोकल (Mumbai local train) प्रमाणेच मुंबईकरांचे आयुष्यही जलद आहे. म्हणूनच मध्य रेल्वे ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. आपल्या खाजगी वाहनाने मुंबईकर हे कामाच्या दिशेने निघालेले आहेत. त्यामुळेच मुलुंड ते कांजूरच्या दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. पुढील काही दिवस ही अशीच परिस्थिती असणार आहे. मध्य रेल्वे वरील जम्बो ब्लॉकमुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
ठाणे रेल्वे स्थानकातील 5 आणि 6 या फलाटाचे रुंदीकरण करण्याचे काम रेल्वे करत आहे. काल मध्यरात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत मेगाब्लॉक रेल्वेतर्फे (Megablock) घेण्यात येणार आहे. यामुळे जवळपास 960 लोकल ट्रेन तसेच एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकातील 36 तासांचा ब्लॉक ३१ मे ते १ जूनच्या मध्यरात्री १२.३० वाजता सुरू होणार. जो २ जून दुपारी १२.३० पर्यंत असणार. ४४४ रेल्वे शॉर्ट टर्मिनेट केल्या जाणार तर ४४६ रेल्वे शॉर्ट ओरिजिनेट करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच या विशेष ब्लॉक दरम्यान कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन मध्य रेल्वेचे केले आहे.