नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – बेशिस्तपणे फटाके फोडत बुलेट चालवत लोकांना त्रास देण्याचं जणू स्वातंत्र्य मिळालं समजणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी कारवाई करत चांगला धडा शिकवला. यामध्ये नागपूर शहरात जवळजवळ 3 हजार दुचाकी चालकांवर बेशिस्त वाहन चालवत असताना कारवाई करण्यात आली. तेच सदर परिवहन विभागाने फुटाळा परिसरात मॉडीफाईड सायलेंसर असलेल्या 54 बुलेट ताब्यात घेत करत मोठी कारवाई केली आहे.
आता सर्व बुलेट धारकांना सायलेन्सर बदलूनच बुलेट दिली जाईल तसेच या सगळ्या सायलेंन्सरवर बुलडोझर चालून ते नष्ट केल्या जाईल जेणेकरून पुन्हा ते सायलेंन्सर वाहनांना लागून नागरिकांना कर्कश आवाजाचा त्रास होणार नाही. तसेच ज्यांची वाहन पोलिसांनी जप्त केली नाही, त्यांनाही कारवाईचा इशारा नागपूरच्या वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त चेतना तिडके यांनी दिली.