महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे ताज्या घडामोडी

मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्याच्या कामासाठी घोडबंदर रस्त्यावरील वाहतुकीत बदल

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे/प्रतिनिधी – ठाणे महानगरपालिका हद्दीत सुरू असलेल्या मेट्रो ४ च्या पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. मानपाडा ते कासारवडवली दरम्यान गर्डर टाकण्याचे वेळी ठाणे ते घोडबंदर वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने सदर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी १५ मे ते २7 मे २०२३ या दरम्यान रात्रौ २३.५५ वा. ते सकाळी ०५.०० वाजे पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.

वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे :-ठाणे घोडबंदर वाहिनी प्रवेश बंद – १) मुंबई, ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – अ) मुंबई, ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजूर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. प्रवेश बंद – २) नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी सर्व जड, अवजड वाहने मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. प्रवेश बंद – ३) मुंबई, ठाणे, नाशिक कडून घोडबंदर रोडच्या दिशेने ठाणे घोडबंदर वाहिनी वाघबीळ ब्रिज वरून व खालून जाणाऱ्या सर्व वाहनांना वाघबीळ ब्रिज चढणी येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे पर्यायी मार्ग – वाघबीळ ब्रिज वरून विरुद्ध दिशेने जावून पुढे वाघबीळ ब्रिज उतरून डावे बाजूस वळण घेवून मुख्य रस्त्याने आनंदनगर जंक्शन मार्गे इच्छित स्थळी जातील

.घोडबंदर ठाणे वाहिनी प्रवेश बंद – (1) गुजरात महामार्गाने ठाणे घोडबंदर रोडच्या दिशेने ठाणे कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.२) मुंबई, वसई, विरार कडून घोडबंदर रोडच्या दिशेने ठाणे कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना फाउंटन हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – गुजरात, मुंबई, विरार, वसई कडून घोडबंदर रोडच्या दिशेने ठाणे कडे येणारी सर्व प्रकारची जड अवजड वाहने चिंचोटी नाका येथून कामण, अंजुर फाटा, माणकोली भिवडी मार्गे इच्छित स्थळी जातील. जड अवजड वाहने सोडून इतर वाहने गर्डर बसविताना आनंदनगर सिग्नल कट जवळ डावे वळण घेवून सेवा रस्त्याने पुढे वाघबीळ ब्रिज येथून उजवे बाजूस वळण घेवून मुख्य रस्त्यास मिळून पुढे इच्छित स्थळी जातील.

१) दि.१५मे २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि.१६ मे २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.

२) दि.१६ मे २०२३ रोजी रात्रौ २३.५५वा. ते दि १७ मे २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.

३) दि.१७ मे २०१३ रोजी रात्रौ २३.५५वा. ते दि. १८ मे २०२३ रोजी सकाळी ०५:०० वाजे पर्यंत.

४)दि.१८मे २०२३ रोजी रात्रौ २३.५५वा. ते दि.१९ मे २०२३ रोजी सकाळी ०५:०० वाजे पर्यंत.

५)दि.१९ मे २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि.२० मे २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.

६)दि.२० मे २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि.२१ मे २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.

७)दि.२१ मे २०२३ रोजी रात्रौ २३.५५वा. ते दि.२२ मे २०२३ रोजी सकाळी ०५०० वाजे पर्यंत.

८)दि.२२ मे २००३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि.२३ मे २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.

९)दि.२३ मे २०१३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि. २४ मे २०२३ रोजी सकाळी ०५०० वाजे पर्यंत.

१०)दि.२४ मे २०२३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि.२५ मे २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.

११)दि.२७ मे २०१३ रोजी रात्रौ २३.५५ वा. ते दि.२८ मे २०२३ रोजी सकाळी ०५.०० वाजे पर्यंत.

ही वाहतूक अधिसूचना वर नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होई पर्यंत अंमलात राहील. ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×