महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ताज्या घडामोडी पोलिस टाइम्स

२०० रुपयाची लाच घेताना ट्राफिक हवालदार एसीबीच्या जाळ्यात

नेशन न्यूज मराठी टिम.

धुळे/प्रतिनिधी– दुचाकी वाहन सोडण्यासाठी केवळ दोनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या धुळे शहर वाहतूक दलातील पोलीस हवालदार उमेश दिनकर सूर्यवंशी यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. या अटकेमुळे पोलिसांच्या गोटात खळबळ उडाली आहे. धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वात हा धुळे शहरातील बारफत्तर चौकातील अँग्लो उर्दू हायस्कूल समोरील रस्त्यावर हा सापळा यशस्वी करण्यात आला आहे.

तक्रारदार हे चाळीसगाव येथील रहिवाशी असून त्यांचे मोटारसायकलवर धुळे येथे नेहमी कामानिमित्त येत असत. धुळे शहरात मोटारसायकलने प्रवास करताना त्यांना तहसिल चौकात तसेच अँग्लो उर्दु हायस्कुल जवळ ड्युटीस असलेले ट्राफिक पोलीस त्यांना विनाकारण अडवून त्यांच्याकडे डायव्हिंग लायन्सस असताना देखील कुठल्या ना कुठल्या कारणांने त्यांच्याकडे २०० ते ५०० रूपयाची मागणी करत, त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे दिले नाही तर ट्राफिक पोलीस त्यांना जाऊ देत नाहीत. व त्यांच्या वाहनांवर मोठ्या रकमेचा ऑनलाईन दंड टाकू, अशी धमकी देत होते. तक्रारदार यांना तेथे ड्युटीस असलेल्या ट्राफिक पोलिसांचा नेहमीचा व पैसे वसुलीचा त्रास होत असल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २ मे रोजी लेखी तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून ही कारवाई केली असल्याचे प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान धुळे शहरात जुना आग्रा रोड लगत अग्लो उर्दु हायस्कुल समोरील रस्त्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांना थांबवून त्यांच्याकडे वाहनांवर ऑनलाईन दंड नको असेल तर २०० रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी करून सदर २०० रुपये लाचेची रक्कम स्वतःसाठी धुळे शहरातील अग्लो उर्दू हायस्कुल समोरील रस्त्यावर स्विकारताना त्यांना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ट्राफिक हवालदारावर झालेल्या या कारवाईमुळे पोलीस खात्यात एकच खळबळ माजली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×