नेशन न्यूज मराठी टीम.
नवी मुंबई / प्रतिनिधी – गणेशोत्सव 2023 च्या अनुषंगाने नवी मुंबई आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये गणेशोत्सव काळामध्ये वाहतुकीचे नियमन करण्यासाठी, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 1 डीसीपी,1 एसीपी, 13 पीआय, 678 अंमलदार, 100 वॉर्डन असा बंदबोस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच दीड दिवस, सात दिवस आणि 10 दिवसांचे गणपती विसर्जनाच्या अनुषंगाने वाहतुक मार्गात बदल करण्यात आलेले आहेत.
वाशी व आजूबाजूच्या परिसरातील सार्वजनिक तसेच घरगुती गणपती विसर्जन शिवाजी चौक सेक्टर 17 मार्गे वाशीतील जागृतेश्वर तलावात विसर्जनासाठी जातात त्यामुळे शिवाजी चौकात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळामध्ये वाहतुकीच्या नियमात मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत तसेच इच्छित स्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग ठेवण्यात आले आहेत.