नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – कासारवाडी वाहतुक उपविभागाच्या हद्दीत दि.०७ सप्टेंबर २०२३ रोजी ‘स्वामी प्रतिष्ठान’ तर्फे ‘गोपाळकाला’ निमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीत दि.७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते रात्री १०.०० वा. या वेळेत बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.
वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे :-
प्रवेश बंद :- (१) उपवन, पवारनगर कडून डॉ. काशिनाथ घाणेकर चौककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना त्यागराज बिल्डींग कट येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग :- या मार्गावरील वाहने त्यागराज बिल्डींग कट येथे उजवे बाजूस वळण घेवून वसंतविहार स्कूल सर्कल, वसंतविहार सर्कल (बाबासाहेब आंबेडकर चौक) मार्गे तुलशीधाम रोडने इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- (२) वसंतविहार सर्कल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) कडून डॉ. काशिनाथ घाणेकर चौक, पवारनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना लोकपुरम पब्लिक स्कूल कट येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग :- ही वाहने वसंत विहार सर्कल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक) येथून तुलशीधाम / वसंतविहार स्कूल मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद :- ३) खेवरा सर्कलकडून हिरानंदानी मिडॉस-डॉ.काशिनाथ घाणेकर चौक/पवारनगरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना शिवसेना शाखा क्र.०४ समोर खेवरा सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग :- सदरची वाहने खेवरा सर्कल येथून दोस्ती इम्पीरिया बिल्डींग मार्गे सर्व्हिस रोडने तुळशीधाम वसंत विहार सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.
ही वाहतूक अधिसुचना दि. ०७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० ते रात्रौ 10.०० वाजेपर्यंत लागू राहील. ही अधिसुचना पोलीस वाहने, रुग्णवाहीका फायर ब्रिगेड व अत्यावश्यक सेवेतील वाहने याना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी कळविले आहे.