नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
गोंदिया/प्रतिनिधी – सध्या गोंदिया जिल्ह्यातील नागरिक दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटत आहेत आणि अशातच गोंदिया-भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा पर्यटनासाठी सध्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येतात. वन्य प्राण्यांना बघण्याकरिता आणि पक्षी प्रेमी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असल्याचे दिसून येत आहे आणि अशातच T4 या वाघिणीचे आपल्या चार बछड्यांसह या परिसरात दर्शन झाल्याने पर्यटकांसाठी ही पर्वणीच बनली आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा वाघांसाठी रेस्ट झोन म्हणून प्रचलित आहे. परंतु सध्या या व्याघ्र प्रकल्पात T4 वाघीण आपल्या 4 बछड्यांसह पर्यटकांना दर्शन देत असल्याने या ठिकाणचे पर्यटन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये या वाघिणीचे दर्शन होत असल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले. पर्यटक नवेगाव-नागझिरा पर्यटनासाठी येत असल्याचे आता दिसून येत आहे.
दिवाळीत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असल्याने येथे काम करणाऱ्या गाईडला सुद्धा मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे आणि गतवर्षीच्या तुलनेत पर्यटन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाल्यामुळे परिसरातील युवकांना रोजगार मिळाल्याने ते सुद्धा आनंदी झाले आहेत. आणि सध्या या ठिकाणी T4 वाघीण आणि इतर प्राण्यांचे दर्शन होत असल्याने पर्यटक देखील आनंदी होऊन या ठिकाणातून जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निश्चितपणाने वनविभागाच्या बरोबरचं गाईड आणि इतर मजुरांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत असल्याचे दिसून येत आहे.