महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

‘उद्या’ कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार तर आबाची गोष्ट’ बाल साहित्य पुरस्काराची मानकरी

    नवी दिल्ली –प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कांदबरीस वर्ष 2020 साठीचा सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला. तसेच प्रसिद्ध बाल साहित्यिक आबा महाजन लिखित ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहास ‘बाल साहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित  ‘साहित्य अकादमी पुरस्कार २०२०’ ची घोषणा झाली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत देशातील २० भाषांकरिता ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ तसेच २१ लेखकांना ‘बाल साहित्य पुरस्कार’ तर १८ भाषांकरिता ‘युवा पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा करण्यात आली.

    साहित्य अकादमीने आज २० प्रादेशिक भाषांतील सात कविता संग्रह, चार कादंबऱ्या, पाच कथासंग्रह ,दोन नाटके, एक संस्मरण आणि एक महाकाव्य या सर्वोत्कृष्ट कलाकृतींना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केला. यात मराठी भाषेसाठी प्रसिद्ध लेखक नंदा खरे यांच्या ‘उद्या’ कादंबरीस हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून यावर्षी विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक वसंत आबाजी डहाके, सतीश काळसेकर आणि डॉ. निशिकांत मिराजकर यांचा समावेश होता. मल्याळम, नेपाळी , उडिया आणि राजस्थानी भाषेसाठीचे पुरस्कार येत्या काळात घोषित करण्यात येणार आहेत.‘उद्या’ हा मागील तीनशे वर्षांपासूनचा लेखकाच्या मनातील सल आहे. लेखकाने कमालीच्या अस्वस्थतेतून वर्तमानाचा वेध घेत या कादंबरीत भविष्याचा बहुआयामी पट सादर केला आहे. या कादंबरीत  सुदीप जोशी, अरुण सन्मार्गी, सच्चिदानंद भाकरे, सानिका धुरू या प्रमुख पात्रांच्या आयुष्यावर सहजगत्या प्रकाश टाकला आहे. सायबर क्राइम आयुक्त झालेला अरुण सन्मार्गी हा अभिव्यक्ती व वर्तन विश्लेषक आहे. सुदीप जोशी हा महिकादळ या मुंबईतील एका प्रमुख पक्षाच्या संघटनेच्या  प्रमुख नेत्याचा लेखनिक आहे.अशा प्रकारे कादंबरीतील सर्व पात्रांना या कादंबरीत उत्तमरित्या न्याय देण्यात आला आहे.

     साहित्य अकादमीच्या वर्ष २०२० च्या बाल साहित्य पुरस्कारासाठी २१  प्रादेशिक भाषांमधील  साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्यामधून आबा महाजन लिखित ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहाची बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे. ५० हजार रूपये आणि ताम्रपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून यावर्षी  विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मराठी भाषेकरिता डॉ. चंद्रकांत पाटील , कृष्णात खोत आणि के.टी. ढाले पाटील यांचा परीक्षक मंडळामध्ये समावेश होता.साहित्य अकादमीच्या वर्ष २०२० च्या युवा पुरस्कारांचीहीघोषणा करण्यात आली.  एकूण १८ प्रादेशिक भाषांतील युवा लेखकांना हे पुरस्कार जाहीर झाले. येत्या काळात मराठीसह गुजराती, सिंधी, बंगाली, राजस्थानी आणि मल्याळम या भाषांसाठी युवा पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे साहित्य अकादमीच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

    Related Posts
      Translate »