नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
बारामती/प्रतिनिधी – शेतकऱ्याला शेती करणे दिवसेंदिवस मोठ्या जिकरीचे होत चालले आहे. त्यातच वाढती महागाई, मंजूर न मिळणे, बदलते हवामान याचा मोठा फटका शेतकऱ्याना बसत आहे. त्यामुळे उत्पन्न कमी व मेहनत जास्त यामुळे अनेक शेतकरी शेतीकडे पाठ फिरवत आहे. तर दुसरी कडे पारंपरिक पद्धतीला बगल देत आधुनिक शेतीकडे वाळलेल्या शेतकऱ्यांनी मोठी आर्थिक किमया पाहवायला मिळते, शेतीत योग्य मार्गदर्शन व योग्य नियोजन असल्यास शेतकऱ्याला मोठा फायदा होऊ शकतो. यामुळेच कृषी विज्ञान केंद्रात वेगवेगळे प्रयोग करत योग्य तंत्राचा वापर करत शेतकाऱ्यांसाठी आशेचा नवीन किरण तयार होताना दिसत आहे. असाच एक प्रयोग बारामतीतील शारदानगरच्या कृषी विज्ञान केंद्रात पाहायला मिळाला आहे.
बारामतीतील शारदानगरच्या कृषी विज्ञान केंद्राच्या कृषिक प्रदर्शनाचा आज दुसरा दिवस असून,यंदाच्या प्रदर्शनात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना नव्यानेच व देशात पहिल्यांदाच साकारण्यात आली आहे.यात पोमॅटो ही नवीन संकल्पना कृषी विज्ञान केंद्रात राबवून यशस्वी पीक घेण्यात आले आहे.टोमॅटोच्या झाडाला कलम करून बटाट्याचे पीक घेण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होणार असून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.या पिकाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहता येत आहे.