प्रतिनिधी.
अमरावती – जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी काल सायंकाळी या रूग्णालयातील कोविड वॉर्डाला भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या रूग्णांना दिलासा दिला.
गत काही आठवड्यांपासून जिल्हा कोविड रूग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रूग्णांशी थेट भेटण्याचा निर्णय पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी घेतला व तत्काळ तो अंमलातही आणला. पालकमंत्र्यांनी काल सायंकाळी सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील स्थापित कोविड रूग्णालयाला भेट दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा कोविड रूग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली. त्यांनी तेथील कोविड वॉर्डात थेट जाऊन त्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या व उपचार घेत असलेल्या रूग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. रवी भूषण यांची टीम अहोरात्र मेहनत जोखमीच्या क्षेत्रात जीवाची पर्वा न करता काम करत आहे. पीपीई कीट घालून ही मंडळी दिवसभर रूग्णसेवा देत असते. आज मी स्वत: पीपीई कीट घालण्याचा अनुभव घेतला. उन्हाळ्याचे दिवस असताना पीपीई कीट घालून दिवसभर काम करत राहणे किती कष्टप्रद असते, याचा अनुभव यानिमित्त मिळाला. सगळे डॉक्टर, पारिचारिका, सफाई कर्मचारी अखंडपणे सेवारत आहेत, असे यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोविड रूग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांशी मी संवाद साधला. त्यांना पुरविण्यात येणारे जेवण, औषधे, डॉक्टर व इतर कर्मचा-यांची सेवा व वागणूक याबाबत प्रत्येकाची मी स्वत: विचारपूस केली. त्यावेळी सर्व दाखल रूग्णांनी आपणास समाधानकारक सेवा मिळत असल्याचे सांगितले. डॉक्टर रवी भूषण यांच्यासह सर्व डॉक्टर कर्मचारी अत्यंत चांगले काम करत असल्याची माहिती या सर्व रूग्णांनी दिली.
पालकमंत्री पुढे म्हणाल्या की, अजूनही आपली लढाई संपलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे, आरोग्य यंत्रणेचे मनोबल खच्ची करण्याचे प्रकार कुणीही करता कामा नये. आपल्या सगळ्यांनी मिळून एकजुटीने जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जिल्ह्यात अद्यापपर्यंत 212 रूग्ण आढळून आले आहेत. त्यातले 120 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याच रूग्णालयात त्यांनी उपचार घेतले आहेत.
आढळलेल्या रुग्णांपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक रूग्णांवर याच रुग्णालयातून उपचार होऊन ते बरे होऊन घरी परतले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार होत आहेत. डॉक्टर व त्यांची टीम या रुग्णांच्या उपचारासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. आपण कोविड रुग्णालयातील प्रत्येक दाखल व्यक्तीला भेटून विचारपूस केली आहे. प्रत्येक वॉर्डाला भेट दिली आहे. रुग्णांची पुरेपूर काळजी घेतली जात आहे. डॉक्टर व आरोग्य यंत्रणा रूग्णांसाठी व समाजासाठी देवदूत ठरली आहे. या काळात सर्वांनी डॉक्टर व आरोग्य यंत्रणेतील प्रत्येकाचे मनोबल टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे व एकजुटीने कोरोनाचा मुकाबला करून त्यावर मात करूया, असे आवाहनही पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले

Related Posts
-
डोंबिवलीत मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अचानक भेट देऊन केली पाहणी
डोंबिवली/प्रतिनिधी - डोंबिवली पूर्वेकडील रेल्वेस्थानकाजवळच्या महापालिका कार्यालयास अचानक भेट देऊन…
-
कल्याणात इडीविरोधात काँग्रेसची केली निदर्शने
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - काँग्रेस अध्यक्षा सोनिया…
-
यंदाची दिवाळी कोविड योध्यांचा सन्मान करण्याची
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवली मनपाच्या वतीने भिंवडी बायपास येथे…
-
डोंबिवलीत मंदिर उघडताच शिवसैनिकांनी केली आरती
डोंबिवली/प्रतिनिधी - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने नियमांचे पालन…
-
डोंबिवलीत दिलासा फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
प्रतिनिधी. डोंबिवली - कोरोना महामारीत रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून…
-
मेळघाटातील धाराकोटमध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण यशस्वी
अमरावती/प्रतिनिधी - लसीकरणाला सुरुवातीला नकार देणाऱ्या धाराकोटच्या नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून…
-
केडीएमसीच्या कोविड रुग्णालयात महिला रुग्णाची सुखरुप प्रसुती
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आर्ट गॅलरी,कल्याण प. येथील कोविड…
-
बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
मुंबई/नेशन न्यूज मराठी टिम - राज्य शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला…
-
टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला ऊर्जामंत्री यांची भेट
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईत दि. १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या वीजपुरवठा…
-
निरंकारी संत समागमाला मुख्यमंत्री याची सदिच्छा भेट
नेशन न्यूज मराठी टीम. औरंगाबाद/प्रतिनिधी - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
-
कल्याण वाहतूक पोलिसांनी केली हेल्मेट वापराबद्दल जनजागृती
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - स्वातंत्र्य दिनाचे औचित्य…
-
आयएनएस सुमेधने बाली, इंडोनेशियाला दिली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय नौदलाच्या आग्नेय…
-
आयएनएस सुमेधाची कलांग बंदराला भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारतीय नौदलाच्या दूरच्या…
-
कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात…
-
नागपूर हज हाऊसमध्ये कोविड सेंटर होणार सुरु
मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हज समितीच्या अखत्यारित असलेल्या…
-
पंढरपूरात होणार अतिरिक्त १२० बेडचे कोविड हॉस्पिटल
पंढरपूर/प्रतिनिधी - वाढत्या कोरोनाचा प्राधुर्भाव रोखण्यासाठी व कोविडच्या रुग्णांना वेळेत…
-
सहकारी कुक्कुट पालन संस्थांना थकबाकीबाबत दिलासा
प्रतिनिधी. मुंबई - कोविड परिस्थितीमुळे फटका बसलेल्या ग्रामीण भागातील शेतीपूरक…
-
कोरेगाव भीमा जयस्तंभ परिसरास अतिरिक्त पोलीस महासंचालकांची भेट
नेशन न्युज मराठी टीम. पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा नजीक…
-
केडीएमसीच्या सहाय्यक आयुक्तांनी केली सशस्त्र पोलीस संरक्षणाची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे -ठाणे महानगरपालिकेच्या माजीवडा-मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर…
-
केंद्र सरकारचा कोविड-१९ इन्होवेशन पुरस्कार केडीएमसीला
कल्याण//संघर्ष गांगुर्डे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे.…
-
नौदलाच्या पूर्व ताफ्यातील जहाजांनी दिली सिंगापूरला भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. सिंगापूर - नौदलाच्या पूर्व ताफ्याचे फ्लॅग…
-
कोविड रुग्णांच्या मदतीसाठी रात्रीच्या वेळी आता केडीएमसीची मध्यवर्ती वॉररुम
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनाचा वाढता प्रभाव आणि रात्री - अपरात्री रुग्णांच्या नातेवाईकांची…
-
कल्याणातील सराईत चैन स्नेचरला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. डोंबिवली/प्रतिनिधी - गुन्हेगारी क्षेत्रात जाणे…
-
अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज भेट
प्रतिनिधी. मुंबई - एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी…
-
ठाणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी केली मतदारांमध्ये जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. ठाणे/प्रतिनिधी -‘मी मतदान करणारंच.. आपणही…
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वन्यजीव सप्ताह प्रदर्शनास भेट
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाच्या…
-
जपानच्या अभ्यासगटाची नवी मुंबईतील पर्यावरणशील प्रकल्पांना भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई / प्रतिनिधी - आधुनिक…
-
नागरी समस्यांसाठी बसपाच्या शिष्टमंडळाने घेतली केडीएमसी आयुक्तांची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - मोहने परिसरातील नागरिकांच्या मूलभूत…
-
कोविड योद्धा पोलीस कर्मचाऱ्यांना जेनेरिक आधारच्या वतीने प्रथमोपचार किट वाटप
मुंबई /प्रतिनिधी - जगात कोविड १९ ने थैमान घातले आहे.…
-
शेलार ग्राम पंचायतीच्या कोविड सेंटरच्या मान्यतेसाठी सरपंच उपोषणाच्या तयारीत
भिवंडी/प्रतिनिधी - भिवंडीतील शेलार ग्रामपंचायतीच्या वतीने उभारलेल्या कोविड सेंटरला जिल्हाधिकारी कार्यालयाची…
-
युक्रेन येथून घरी परतलेल्या विद्यार्थ्याची जिल्हाधिकारी यांनी घेतली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. बीड -युक्रेन आणि रशिया युद्ध सुरू…
-
१९ वर्षीय तरुणीची हत्या करुन आरोपीने केली आत्महत्या
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबईतील…
-
कोविड परिस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी घाबरून जाऊ नये – मुख्यमंत्री
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात…
-
मुंबईत रुग्णालयातून मुल चोरणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईतील कांदिवली पोलिसांनी…
-
मंत्री आदित्य ठाकरे यांची वरळी येथील लसीकरण शिबिरांना भेट
मुंबई/प्रतिनिधी - वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण…
-
चंद्रभागा नदीत घाणीचे साम्राज्य; भाविकांनी व्यक्त केली नाराजी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - जसे पंढरपूरला भूवैकुंठ म्हटले…
-
आयएनएस सुजाता नौकेची मोझांबिक मधील मापुटो बंदराला भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नौदलाच्या दक्षिणकमांड अंतर्गत…
-
वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या घेणार NRC कामगारांची भेट
कल्याण प्रतिनिधी - आंबिवली येथील NRC ही कंपनी गेल्या १२…
-
लष्करप्रमुखांनी घेतला संरक्षणव्यवस्थेचा आढावा, जवानांसोबत दिवाळी केली साजरी
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - लष्करप्रमुख जनरल मनोज…
-
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला १३ सदस्यीय पत्रकार चमूची भेट
नेशन न्यूज मराठी टीम. गोवा / प्रतिनिधी - गंगटोक पत्र…
-
ब्राझीलच्या नौदल शिष्टमंडळाने भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाला दिली भेट
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- ब्राझीलच्या नौदल शिष्टमंडळाने व्हाइस…
-
केडीएमसी आयुक्तांनी हजेरी शेडला भेट देत कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी कल्याण…
-
मतदान जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम, तयार केली मानवी साखळी
नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी – तरुणाई ही देशाच्या…