नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – नाशिक शहर यांनी अंमली पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेतले आहे. अंमलदार अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाविषयी मिलींदसिंग परदेशी यांना त्यांच्या गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली होती की, ” रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार निखिल पगारे हा एम. डी विक्री करतो व तो त्याचा साथीदार घोडेराव हे एम.डी हा अंमली पदार्थ विक्री करण्या करीता हॉटेल स्वरांजलीच्या पाठीमागे, दामोदर नगर पाथर्डी नाशिक या ठिकाणी येणार आहेत.” अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरून सदर ठिकाणी कारवाई करण्याची योजना आखली.
पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, हेमंत तोडकर, हेमंत नागरे, चेतन श्रीवंत, महेश क पोना, मिलींदसिंग परदेशी, पोअं/विलास चारोस्कर, नितीन जगताप, मुक्तार शेख, राजेश राठोड, असे पथक तयार करून मिळालेल्या माहिती प्रमाणे सदर ठिकाणी जावुन सापळा लावुन एम.डी विक्री करणारे इसम नामे निखील बाळु पगारे वय-२९ वर्षे रा- विक्रीभवन समोर पाथर्डीफाटा शिवार नाशिक, कुणात घाऱ्या संभाजी घोडेराव, वय २२ वर्षे, रा- उत्तमनगर, सिडको नाशिक अशांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडील एक लाख रूपये किंमतीची २० ग्रॅम एम.डी. (मॅफेड्रॉन) ही जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपींना इंदिरानगर पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८(क), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास अंमली विरोधी पथकाचे सपोनि / हेमंत फड हे करीत आहेत. निखील बाळु पगारे हा रेकॉर्ड सराईत गुन्हेगार असुन टिप्पर गँगचा सदस्य आहे असे त्यांनी स्पष्ट केले.नाशिक पोलीसांमार्फत नाशिक शहर हे एम. डी मुक्त करण्याबाबतचे धोरण पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी अवलंबिले असुन कोणीही अंमली पदार्थ विकी व सेवन करू नये याबाबत सक्त आदेश दिले आहेत.