नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – जनावरांच्या कातड्याचा वापर अनेक नित्याच्या महागड्या वस्तू बनविण्यासाठी केला जातो जागतिक बाजारपेठेत प्राण्यांच्या दात व कातड्याची मोठी मागणी असते. भारतातून अनेक जंगल प्राण्याची अवैध शिकार केली जाते. त्या वस्तूंना चांगल्या किमती मिळाल्याने अनेक चोर असे प्राण्यांची अवैध हत्या व कातड्यांचा व्यापार करतात अश्याच प्रकारे वाघाच्या कातडीची तस्करी करणाऱ्या आरोपीला मुंबईत अटक झाली.
पट्टेरी वाघाची कातडी तसेच पंजाची तस्करी करणाऱ्या तिघांना एम एच बी कॉलनी पोलिसांनी अटक केली. राष्ट्रीय प्राणी असलेल्या पट्टेरी वाघाची कातडी व पंजांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना एमएचबी कॉलनी पोलिसांनी पकडून अटक केली. या तस्करांकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.