नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम.
कल्याण/प्रतिनिधी – दीपावली निमित्त वायु व ध्वनी प्रदुषण वाढविणारे फटाके फोडू नयेत या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या निर्देशानुसार व शिक्षण विभागाचे उपायुक्त अवधूत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिक्षण विभागातील महानगरपालिका, खाजगी अनुदानित, विना अनुदानित शाळांनी आज आपापल्या शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढून जनजागृती करत प्रदुषणमुक्तीचा संदेश दिला .
या विदयार्थ्यांनी वेगवेगळ्या कल्पक बॅनर्स व घोषवाक्यांचा वापर करुन ही दिवाळी प्रदुषण मुक्त होण्यासाठी, प्रदुषणाचे दुष्परिणाम समजावून सांगण्याचा प्रयत्न आपल्या प्रभातफेरी व्दारे केला. या वेळी या शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी प्रदुषण करणार नाही यासाठी प्रतिज्ञा घेतली. यासाठी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी रंजना राव व शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
“नको फटाक्यांची धुळ आणि धूर – दिव्यांची रोषणाई करुया भरपुर”, “आवाज आणि धुराच्या फटाक्यांना द्या नकार – प्रदुषण मुक्त वातावरणाचा करा स्विकार,” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी प्रदुषण मुक्त दिवाळी साजरा करण्याचा निश्चय केला.