महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
क्रिडा लोकप्रिय बातम्या

नाशिक मध्ये रंगणार राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेचा थरार,स्पर्धेसाठी ८०० खेळाडूंचा सहभाग

नेशन न्युज मराठी टिम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ वि राज्यस्तरीय सब ज्युनिअर क्यूरोगी व ४ थी राज्यस्तरीय कॅडेट क्यूरोगी तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन नाशिक येथील  इंडोर हॉल, डिव्हीझिनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स  पंचवटी, नाशिक येथे करण्यात आले आहे.

रविवार पासून या राज्यस्तरीय स्पर्धेला सुरवात होणार असून राज्यभरातून विविध जिल्यातील जवळपास ८०० च्या आसपास खेळाडू आपले कस आजमावणार असून  कोरोनाच्या काळात क्रीडा क्षेत्राला लागलेले विघ्न संपुष्टात आल्याने राज्यभरातील क्रीडा क्षेत्रातील खेळाडू व प्रशिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे.

 राज्याचे क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांना नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धाला उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण पत्र  तायक्वांदो असो.ऑफ.महाराष्ट्रच्या वतीने देण्यात आले. यावेळेस महाराष्ट्र ओलंपिकचे महासचिव नामदेव शिरगावकर आणि तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे महासचिव  संदीप ओंबासे उपस्थित होते.

कोरोना महामारी व इतर कारणांमुळे गेली काही वर्षे स्पर्धा झाल्या नाहीत, आणि आता नाशिक येथे राज्यस्तरीय स्पर्धा होत आहेत हे एक मुलांसाठी व कोचेस साठी एक आनंदोत्सव आहे. महत्वाचं म्हणजे सबज्युनिअर आणि कॅडेट स्पर्धा होत असतांना आतापर्यंत ८०० स्पर्धकांची ऑनलाईन नोंदननी नोंदवली गेली आहे. तसेच वर्ल्ड तायक्वांदो नियमाप्रमाणे या स्पर्धा खेळविल्या जातील, विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिस्टमवर ही स्पर्धा खेळविण्यात येणार असून स्पर्धकांचे  कोणतेही नुकसान यात होणार नसल्याची माहिती  संदीप ओंबासे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×