महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image इतर चर्चेची बातमी

तीन बिबट्यांची करंट देऊन शिकार

नेशन न्यूज मराठी टीम.

गोंदिया / प्रतिनिधी – गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील देवरी आमगाव रोडवरील वडेगाव या गावाच्या जवळ जंगलामध्ये तीन बिबट्यांचा करंट लावून मारल्याची घटना घडली आहे. या तीन बिबट्यांना गेल्या तीन ते चार दिवसांपासून मारण्यात आले होते आणि या विषयी वनविभागाला माहिती मिळताच वनविभागाचे पथक आज सकाळी या ठिकाणी झालं दाखल झाले.

सदर जंगलाची जागाही एफडीसीएम च्या अंतर्गत असून याविषयी एफडीसीएम च्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यापूर्वी वन विभागाने गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणातील आठ आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

एकीकडे काही दिवसांपूर्वीच सालेकशा तालुक्यात वाघाची शिकार करण्यात आली होती आणि आता तीन बिबट्यांची करंट लावून शिकार करण्यात आली असल्यामुळे वन्य प्राणी सुरक्षित नसल्याचे गोंदिया जिल्ह्यात दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×