महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
यशोगाथा लोकप्रिय बातम्या

महाराष्ट्रातील तिघांना जीवन रक्षा पदक जाहीर,देशातील ५९ व्यक्तींना जीवन रक्षा पदक

प्रतिनिधी.

नवी दिल्ली – दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातील  ५९  व्यक्तींना आज ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झालेत. यात महाराष्ट्रातील तिघांचा समावेश आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या परवानगीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने देण्यात येणारे ‘जीवन रक्षा पदक २०२०’ पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. महाराष्ट्रातील परमेश्वर बालाजी नागरगोजे यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’ जाहीर झाले आहे. तर ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार अनिल दशरथ खुले आणि  बाळासाहेब ज्ञानदेव नागरगोजे यांना जाहीर झाला आहे.

देशातील ५९ नागरिकांना तीन श्रेणीत हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यातील एका व्यक्तीस ‘सर्वोत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’ हा  पुरस्कार  मरणोत्तर जाहीर झाला आहे.  देशातील आठ जणांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक पुरस्कार’  जाहीर झाले आहेत. ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ एकूण ३१ जणांना जाहीर झाले आहेत. पुरस्काराचे स्वरूप पदक, केंद्रीय गृहमंत्री यांच्या सहीचे प्रमाणपत्र आणि डिमांड ड्राफ्ट स्वरूपात पुरस्कार रक्कम असे आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही कालावधीने देशातील संबंधित राज्य शासनाच्या वतीने हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

Translate »
×