नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
चंद्रपूर/प्रतिनिधी – जगप्रसिध्द ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातर्फे वन्यजीव संरक्षण, शाश्वत पर्यटन आणि स्थानिक वारसा यांना चालना देण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे आयेाजन करण्यात आले आहे. 200 पेक्षा जास्त अधिवास असलेल्या आणि वाघांची भूमी म्हणून प्रसिध्द असलेल्या चंद्रपूरमधील विविध ठिकाणी हा भव्य महोत्सव होणार आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन सिनेअभिनेत्री रवीना टंडन यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसार माध्यमांशी यावेळी रवीना टंडन यांनी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, असे आयोजन भविष्यात सुद्धा व्हायला पाहिजे. चंद्रपुरात ताडोबा सारखे अभयारण्य संपूर्ण जगात प्रख्यात आहे. आज उद्घाटन कार्यक्रमात मिस वर्ल्ड स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांनी सुद्धा भाग घेतला. त्यांच्या माध्यमातून आपल्या देशातील निसर्ग व ताडोबा प्रसिद्धी होणार. महाराष्ट्र आपल्या वन संपदेसाठी किती जागरूक आहे, हा या माध्यमातून जगात संदेश जाणार.