महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
अर्थसत्ता ताज्या घडामोडी

२३१.४९ कोटीची बनावट बिले बनवल्या प्रकरणी तीन कंपनी मालकांना अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – कर चुकवेगिरी करणाऱ्या कंपन्यांविरोधातल्या विशेष तपास मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विभागाने ओम इम्पेक्स आणि इतर दोन कंपन्यांचा मालक ब्रिजेश वनितलाल  शहा वय 48 याला दिनांक 4.8.22 रोजी अटक केली.

यासंदर्भात ओम इम्पेक्स कंपनीच्या कामकाजाच्या ठिकाणी धाड टाकण्यात आली. यादरम्यान केलेल्या प्राथमिक तपासात असे आढळून आले की,ओम इम्पेक्स ही कंपनी आणि इतर दोन कंपन्या ब्रिजेश्वरी इंटरप्राईजेस आणि चेतना मेटल्स एलएलपी यांनी संशयित अप्रमाणिक करदात्याकडून 231.49 कोटी रुपयाच्या बनावट बिलांच्या स्वरूपात 41.67  कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC)  मिळवले आहे. महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ब्रिजेश वनीतलाल शहा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या तपास मोहिमेत राज्याच्या मुंबई कर विभागाचे सह आयुक्त तपास-  अ, सनदी अधिकारी राहुल  द्विवेदी, राज्य कर विभागाचे उपआयुक्त नीळकंठ घोगरे  आणि राज्याच्या कर विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष कुमार राजपूत, अमोल सूर्यवंशी आणि लीना काळे यांचा समावेश होता.

चालू आर्थिक वर्षात या मोहिमेसह राज्याच्या वस्तू आणि सेवा कर विभागाने ही तिसावी अटक केली आहे. वस्तू आणि सेवा कर विभागातल्या अंतर विभागीय सहकार्य आणि आधुनिक विश्लेषणात्मक साधनं यांच्या जोरावर ही मोहीम आणखी प्रबळ होणार आहे आणि यामुळे फसवणूक करणाऱ्यांना एक संदेश जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×