भिवंडी/प्रतिनिधी – वारकरी संप्रदाय आमने-लोनाड परिसराच्या वतीने ज्ञानेश्वर माऊलींची पायी दिंडी पालखी सोहळ्याचे आयोजन सवाद गावातून करण्यात आले होते. भिवंडी ग्रामीण विभागाच्या बावीस गावच्या हजारों वारकरी दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण ग्रामीण भाग ज्ञानोबा तुकाराम माऊलींच्या गजराने दुमदुबून गेला होता.कार्तिकी एकादशी निमित्त देहू-आळंदीच्या यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखों वारकरी भक्तगण ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीसाठी आळंदी येथे प्रस्थान करत असतात. कार्तिकी एकादशीच्या दिवशी आळंदी देवस्थान येथे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची यात्रेचा सोहळा रंगत असतो. यात्रेच्या दिवशी ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन होणे हे वारकरी भक्तांसाठी मोठे भाग्य समजले जाते.
महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. ज्ञानेश्वर माऊलींच्या भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी व टाळ, झांजांच्या तालावर भावंतांचे अभंग गात ही पालखी खांद्यावरून आळंदीच्या दिशेने चालत नेतात. गळयात तुळशीच्या माळा घालतात व कपाळी गंध लावतात, डोक्यावर तुलसी वृंदावन घेऊन महिला भगिनी कार्तिकी एकादशीच्य दिवशी आळंदी येथे पोहचण्यासाठी पावले पुढे-पुढे टाकत सज्ज होत असतात. भिवंडी ग्रामीण परिसरातील आमणे, लोनाड, वाशेरे, पिसे, किरवली, इताडे, सांगे, नांदकर, देवरुंग, बाबगाव, शिवनगर, सावाद, वैजोले, मुठवळ, खांडवल, जांभुळपाडा, जानवळ, वलशिंद, बापदेव पाडा, वाकीपाडा, भवाळे, देवरुंग पाडा, आमने पाडा या बावीस गावांची मिळून ही दिंडी पालखी काढण्यात येत असते. या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी भक्तगण सरसावले असून चौकाचौकातून वारकरी भक्तांसाठी उपहाराची व्यवस्था करण्यात येत असते.
विठ्ठलाची भव्य प्रतिमा रथात ठेऊन दिंडी आळंदीच्या दिशेने प्रस्थान करत असताना असुरलेले भक्तांचे डोळे विठ्ठल मूर्तीकडे बघून तृप्त होत होते. महाराष्ट्रातला सर्वात मोठया प्रमाणात साजरा केलेला सांस्कृतिक सोहळा आणि धार्मिक परंपरेचा मान हा पालख्यांचा असतो. संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून दरवर्षी ज्ञानेश्वर यांच्या पालख्या अनुक्रमे आळंदी व देहू येथून निघून पंढरपूरला जातात. आषाढी एकादशीला भक्तगण पंढरपूरला विठोबा-रखुमाईचे दर्शन घेतात आणि द्वादशीला आपापल्या गावी परततात. या दोन महत्त्वाच्या पालख्यांबरोबरच संत ज्ञानेश्वरांचे धाकटे भाऊ संत सोपानदेव यांची पालखीही सासवड येथून निघून पंढरपूरकडे रवाना होते. महाराष्ट्रातील तळागळापर्यंतच्या लोकांपर्यंत पोचलेला हा सांस्कृतिक वारसा आहे.
ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमीला देहूहून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे तर ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पंढरपुरासाठी प्रस्थान ठेवण्यात येते. पालखीमध्ये ज्ञानेश्वर व तुकाराम यांच्या चांदीच्या पादुका पूजा करून ठेवल्या जातात. ज्ञानेश्वरांचा उल्लेख ‘माऊली’ असा केला जातो. पालख्यांच्याबरोबर मानाचे अश्वही या दिंडीत सामील होतात. या पालखीचे प्रमूख जनार्दन महाराज पाटील इताडे यांच्याकडे गेल्या तेरा वर्षापासून मान आहे. तर पालखी सोहळ्यात डी.वाय. फौंडेशनचे संसथापक दयानंद चोरघे, कार्याध्यक्ष युवानेता, डी. वाय.फाउंडेशन (एनजीओ) महाराष्ट्र राज्यविरेन दयानंद चोरघे , काँग्रेस परिवहन विभाग जिल्हा अध्यक्ष शांताराम म्हात्रे, योगेश पाटील, दीपक केणे, संतोष काकडेसह हजारों वारकरी संप्रदायाचे भक्तगण सहभागी झाले होते.
Related Posts
-
पर्यावरण रक्षणाचा संदेश घेऊन चालली विठुरायाची दिंडी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण- आषाढी एकादशीनिमित्त कल्याणात निघालेल्या दिंडीमध्ये…
-
विविध मागण्यांसाठी हजारो आशा स्वयंसेविका रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा,…
-
मोहिनी एकादशी निमित्त पंढरीत हजारो भाविक दाखल
nation news marathi online पंढरपूर/प्रतिनिधी - वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त…
-
जागतिक छायाचित्र दिनानिमित्त कॅमेरा दिंडी चे आयोजन
नेशन न्यूज मराठी टीम. बुलढाणा / प्रतिनिधी - छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी…
-
दुर्गाडी किल्ल्याच्या ईदगाहावर हजारो मुस्लिम बांधवांचे नमाज पठण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - ईद उल अजहा अर्थात ‘बकरी ईद’ निमित्त कल्याणात दुर्गाडी…
-
नाशिकचे हाजी मोहम्मद अली करणार पायी हज यात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. नाशिक/प्रतिनिधी - मुस्लिम धर्मीयांमध्ये हज यात्रा…
-
कल्याण मधील बालक मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांची अनोखी दिंडी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - “देवशयनी आषाढी एकादशीचे” औचित्य…
-
शहीद कैलास दहिकर यांना हजारो लोकांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप
प्रतिनिधी. अमरावती - हिमाचलात कर्तव्यावर असताना शहीद झालेल्या कैलास दहिकर…
-
पायी जाणार्या मजुरांना रस्त्यात पाणी,जेवण उपलब्ध करून द्या प्रकाशआंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
पुणे, दि. १५ राज्यांतर्गत आणि राज्याबाहेर जाणाऱ्या मजुरांसाठी पाणी आणि…
-
राज्यातील हजारो पोलीस अंमलदारांना मिळणार पदोन्नतीची संधी,शासन निर्णय जारी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील हजारो पोलीस शिपायांचे पोलीस…
-
७५ व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा समारोप, महाराष्ट्रातून हजारो भक्तगण सहभागी
नेशन न्यूज मराठी टीम. हरियाणा/संघर्ष गांगुर्डे - ‘स्वतःला शांती व प्रेमाचे…