पंढरपूर/प्रतिनिधी – वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीनिमित्त पंढरीत हजारो भाविकांची अलोट गर्दी दिसून येत आहे. वैशाख शुद्ध मोहिनी एकादशी हजारो भाविक पंढरीत दाखल झाले असून, दर्शनासाठी जवळपास ५ ते ६ तास लागत आहेत. चंद्रभागा नदी, नौका विहार, महाद्वार, प्रदक्षिणामार्ग, पश्चिम प्रवेशद्वार सह विठुरायाची पंढरी नगरी गजबजुन गेली आहे.
आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी मंदिर परिसरात गर्दी केली आहे. सध्या मंदिर जिर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने भाविकांना पदस्पर्श दर्शन घेता येणार नाही. मात्र, २ जून पासून श्री विठ्ठलाचे व रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेता येणार आहे.