नेशन न्यूज मराठी टीम.
अहमदनगर / प्रतिनिधी – शेवगाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अहमदनगर साखर सहसंचालक कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन चालू आहे. गळीत हंगाम २०२२, २३ मध्ये लोकनेते मारुतराव घुले पाटील सहकारी साखर कारखाना भेंडा तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे टनामागे कापलेले १०९ रुपये तात्काळ द्यावे
तसेच वृद्धेश्वर सहकारी साखर कारखाना आदिनाथ नगर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर, या ही सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२२,२३ या वर्षामध्ये शेतकऱ्यांचे कापलेले पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावेत या मागणीसाठी आंदोलन अहमदनगर साखर आयुक्त कार्यालयामध्ये सुरू करण्यात आले आहे.