महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
यशोगाथा

यावर्षीचा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने यांना जाहीर

प्रतिनिधी.

कोल्हापूर- राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2020 चा राजर्षी शाहू पुरस्कार राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना देण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. दत्तात्रय कवितके, शाहू स्मारकचे व्यवस्थापक कृष्णाजी हारूगडे उपस्थित होते.
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी शाहू जयंती निमित्त समाज कार्य, समाज प्रबोधन, साहित्य कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तिस अथवा संस्थेस सन 1984 पासून राजर्षी शाहू पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आतापर्यंत हा पुरस्कार भाई माधवराव बागल, व्ही शांताराम, डॉ. बाबा आढाव, तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गुरु हनुमान, साथी नानासाहेब गोरे, चंद्रकांत मांढरे, कुसुमागरज, सुश्री मायावती, न्यायमूर्ती पी.बी. सावंत, रँग्लर नारळीकर, आशा भोसले, राजेंद्रसिंह, प्रा. एन. डी. पाटील, कॉ. गोविंद पानसरे, भाई वैद्य, शरद पवार, पुष्पा भावे, अण्णा हजारे आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सन 2020 चा 35 वा राजर्षी शाहू पुरस्कार पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांना जाहीर करण्यात आला आहे. राजर्षी शाहू पुरस्काराचे स्वरुप हे 1 लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे असून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यातील मेकगाव हे त्यांचे जन्म गाव असून कमवा व शिका या योजने अंतर्गत शिक्षण पूर्ण केले. मराठवाडा विद्यापीठातून 1981 मध्ये मेडिसीन क्षेत्रात पदवी घेतली 1985 मध्ये त्याच विद्यापीठातून नेत्ररोग शास्त्रात मास्टर ऑफ सर्जरी पदवी घेतली. त्यांनी आतापर्यंत 1 लाख 49 हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत. सर जे.जे. रुग्णालयात ते नेत्र चिकित्सा विभागात प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. स्वत:च्या मुत्रपिंड प्रत्यारोपणानंतरही दिवसातून 12 ते 14 तास रुग्णालयात काम करत होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात नेत्र शिबिरांमध्ये विशेषत: बीना टाक्यांची शस्त्रक्रियामध्ये त्यांचे विशेष योगदान राहिले आहे. मोतीबिंदूंची गुंतागुंत असलेल्या 2061 कुष्ठरोग्यांची शस्त्रक्रिया केली आहे. बाबा आमटेंच्या आनंदवन आश्रमात आशा शस्त्रक्रियेमुळे 35 टक्यांवरुन 1 टक्का इतका खाली गुंतागुंतीचे प्रमाण आणले आहे. यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण करुन अंध आणि प्रौढांना नवी दृष्टी दिली आहे.
राष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचे 100 हून अधिक सादरीकरणे आहेत. महाराष्ट्र आरोग्य सेवा विद्यापीठाच्या व्यवस्थापकीय परिषदेचे ते सदस्य असून वैज्ञानिक ज्ञानासाठी आणि सामाजिक कार्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘सर्वोत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार’, ‘आठवले पुरस्कार’, ‘मराठवाडा गौरव पुरस्कार’, ‘करवीर जीवन गौरव पुरस्कार’, ‘सर्वोत्कृष्ट समुदाय सेवांसाठी सुवर्णपदक’, ‘उत्कर्ष कार्यकर्ता पुरस्कार’, ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’, ‘लोकमत मराठवाडा’ यांचा समावेश आहे. गौरव पुरस्कार ‘,’ लातूर गौरव पुरस्कार ‘,’ डॉ. मुलाय स्मृती वक्तृत्व पुरस्कार ‘,’ डॉ. दलजितसिंग सुवर्णपदक ‘,’ लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्ड ‘,’ जायंट्स इंटरनॅशनल अवॉर्ड ‘,’ बेस्ट डॉक्टर अॅ वॉर्ड ‘, ऑगस्ट 2007 मध्ये 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याच्या पराक्रमाबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला. झी टीव्ही “अनन्या सन्मान २००” ”. उत्तर प्रदेश नेत्रदीपक सोसायटीतर्फे 23 व्या वार्षिक परिषदेत त्यांना “दृष्टीकोन पुरस्कार” देण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते त्यांचा “नाशिक नागरी सात्कार” देऊन गौरव करण्यात आला. “लोकमत गौरव” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन २००8 साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात आला. मुंबईच्या महापौरांनी त्यांचा ‘नागरी सात्कार’ देऊन गौरव केला आहे.

Related Posts
Translate »