Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
राजकीय

हा गोळीबार शिंदे-फडणवीस यांच्यातला गँग वॉर – सुषमा अंधारे

Nation news marathi online

वाशिम/प्रतिनिधी – उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा आज वाशिम जिल्ह्यात आली असून, त्यांच्या या यात्रेचं मोप, भर जहांगीर, मांगवाडी इथं स्वागत करण्यात आले. त्यांनी शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मधला स्वश्रेष्ठत्वतेचा वाद शिगेला पोहचला आहे. मै बडा की तू बडा हे दाखवण्यासाठी रस्सीखेच सुरू असून, गोळीबार ही धुसफूस नसून हे गॅंग वॉर आहे.

शिंदे-फडणवीस यांच्यातला हा गँग वॉर आहे. या गॅंग वॉर मध्ये आपले गुंड पाळायचे असतात, तसे हे पाळले आहेत. हे लोकप्रतिनिधी नाही आहेत. हे गुंड पाळलेले आहेत. यांचे जळगाव मधील किशोर पाटील पत्रकाराला मारहाण करतात, आमदार संतोष बांगर हे अधिकारी, कर्मचाऱ्यांना मारहाण करतात आणि स्वतः मारहाण केल्याचं सांगतात. आमदार गीता जैन अभियंत्याला मारहाण करतात, आमदार संजय गायकवाड हे मंत्री छगन भुजबळ यांच्या बद्दल गलिच्छ भाषा वापरतात. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्याला भाजप आमदार सुनील कांबळे मारहाण करतात, तर गणपत गायकवाड गोळीबार करून त्याचं समर्थन करतात. जर पहिल्याच घटनेला कुठेतरी चाप लावला असता, तर हे घडलं नसतं.

लोकप्रतिनिधींना लोकप्रतिनिधी म्हणून काम न करू देता त्यांना गुंड म्हणून पाळण्याचा प्रघात इथे पडत असल्याची टीका उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. मला जरांगे आणि राज ठाकरे यांच्या वादात पडायचं नाही. इथं महिलांचे, विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तलाठी भरती मध्ये 200 पैकी 216 मार्क मिळाले तरी ती परीक्षा रद्द होत नाही. सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत. हे प्रश्न माझ्या साठी महत्वाचे आहेत. मला विना कारणाच्या राजकीय कलगीतुऱ्यात मला रस नसल्याचं सुषमा अंधारे यांनी म्हटल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X