नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्राचे मंत्रिमंडळाचे बैठक होत आहे. बैठकीच्या या धर्तीवर नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीका केली त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, या सरकारकडून अपेक्षा करू नये अशा पद्धतीचे चित्र आज निर्माण झाले आहे.देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना मराठवाडा विकासासाठी 42 हजारकोटींची घोषणा केली होती, त्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे.
फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये सुरु असलेल्या बैठक घेण्याच्या निर्णयाचा त्यांनी निषेध व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कालावधीत 35 टक्के व्यवसाय वाढ झाली, 42 टक्के रोजगार निर्मिती झाली, उद्योगधंदे यात वाढ झाली. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, त्यांनी विकासाच्या दृष्टीने जे पाऊल उचलले त्यामुळे महाराष्ट्र विकासाकडे गेला. सध्याच्या महायुतीच्या सरकारच्या काळात उद्योग धंदे हे गुजरातला गेले, महाराष्ट्राचा औद्योगिक विकास कमी झाला. हे सरकार घोषणा करणारे आणि अधोगतीकडे नेणारा सरकार आहे असे पटोले म्हणाले.