नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापुर/प्रतिनिधी – सोलापुरातील वादग्रस्त सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को-जनरेशनची चिमणी पडल्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणात राजकीय पडसाद उमटत आहेत. आज काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी कारखान्याचे संचालक धर्मराज कडादी यांची भेट घेतली. आणि सत्ताधारी भाजपला चॅलेंज केल आहे. “बघुयात किती दिवसात तुम्ही तुमची विमानसेवा सुरु करता” हे भाजप सरकारच फक्त विकासाच नाटक करत आहे.अशी जोरदार टिका यावेळी त्यानी केली.
येव्धात विकास करायचा होता तर बोरामणी विमानतळाला फंड का दिला नाही असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी यावेळी भाजप सरकारला केला. मी लिहून देते त्यांना हे जमणार नाही, फक्त वैयक्तिक राजकीय हेतूपोटी दुश्मनी काढून चिमणी पाडण्यात आली आहे. लाखो शेतकऱ्यांचे आयुष्य उधवस्त करण्यासाठी आणि पोटावर पाय देण्यासाठी हे 50 खोकेवालं भाजप सरकार जबाबदार आहे. दरम्यान, घडलेल्या सर्व प्रकारचा आम्ही निषेध करत आहोत. आणि सर्व शेतकऱ्यांसोबत आमची सहानुभूती आहे. वैयक्तिक दुश्मनी आणि इगोमुळे हे केल गेलं आहे. विकास काम भाजपला जमत नाही. ”महाराष्ट्रातील लोकांना कसं मानसिक छळ द्यायचा हेच त्यांना व्यवस्थित जमत” असं म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप वर कडाडून टीका केली आहे.