नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – दक्षिण मध्य मुंबईची जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे गेल्याने वर्षा गायकवाड प्रचंड नाराज होत्या. मुंबई दक्षिण मध्यची जागा उद्धव ठाकरेंना दिल्याबद्दल त्यांनी ‘आक्षेप’ व्यक्त केला होता. अखेर वर्षा गायकवाड यांची प्रतीक्षा संपली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील नाराजी देखील कमी झाल्याचे दिसत आहे. कारण काँग्रेसने उत्तर मध्य मुंबईमधून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. आता कोणतीही नाराजी नसून आम्ही एकत्र आहोत, एक कुटुंब आहोत तसेच एकत्र मिळून काम करू असे वर्षा गायकवाड म्हणाल्या.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला त्या म्हणाल्या “काँग्रेस पक्षाचे मी आभार व्यक्त करते कि त्यांनी पुन्हा एकदा मला संधी दिली आणि माझावर विश्वास टाकला. उद्धव ठाकरे यांचे सुद्धा आभार मानते. येणाऱ्या काळामध्ये वर्षाला आम्ही खासदार बनवून पाठवणार असे बोलुन त्यांनी मला अश्वस्वत केलं होतं. महाविकास आघाडीचे सर्व नेते कार्यकर्ते विजयासाठी एकत्र पणे काम करतील. येणाऱ्या काळात शरद पवार यांची देखील भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेणार आहे.”
तसेच बीजेपीवर त्यांनी कडाडून टीका केली. त्या म्हणाल्या “संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष असणार आहे. भाजप विरुद्ध भारताचे लोक अशी ही लढाई आहे. यावेळी जनतेलाच उतरावं लागेल मैदानामध्ये आणि आम्हाला खात्री आहे जनता सुज्ञ आहे.” ही लढाई आता लोकांनाच हातात घ्यावी लागणार आहे. जनता जशी सरकार बनवते तसेच जनता सरकार खाली देखील खेचू शकते हे यावेळी दिसेल. असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी नगरिकांना केले.
महायुतीकडून अजून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुतीकडून उत्तर मध्य मुंबईमधून उज्वल निकम आणि आशिष शेलारांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मुंबईत ठाकरे गटाकडून मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई दक्षिण मध्य मधून अनिल देसाई, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल किर्तीकर आणि मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दीना पाटलांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर उत्तर मुंबईमधून काँग्रेसनं आपला उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही.