नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.
बारामती/प्रतिनिधी – आज पूर्ण देशभरात पवन पुत्र हनुमानाची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणारे अनेक उमेदवार आणि नेतेमंडळी आज हनुमान मंदिरात दर्शन घेण्यासाठी येताना दिसले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी कन्हेरी येथील मारूतीचे दर्शन घेतले. सर्व नांगरिकांना शुभेच्छा दिल्या त्या म्हणाल्या “मी बऱ्याच वेळा मारुती मंदिराला येते. माझ्या जन्माच्या अगोदरपासून माझ्या कुटुंबाचा या कन्हेरी च्या मारुती रायावर विश्वास, श्रद्धा आहे. आजी-आजोबा पासून सुरू असलेली श्रद्धा निष्ठा आजही आहे. आज हनुमान जयंती निमित्त सगळ्या भक्तांना शुभेच्छा देते” असे त्या यावेळेस म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी सरकार वर हल्लाबोल केला. माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर दुष्काळाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या “महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे. तर काही ठिकाणी प्रचंड उन्हाळा आणि दुष्काळाची परिस्थिती आहे. मी सातत्याने महाराष्ट्र सरकारला विनंती करत आलेले आहे, की तुम्ही काहीतरी मार्ग काढा. पाण्याचे आणि दुष्काळाचे योग्य ते नियोजन करा. पक्ष फोड आणि घर फोड यामध्ये हे सरकार व्यस्त आहे. पाण्याचे नियोजन करण्यामध्ये या सरकारला अपयश आले आहे.” अशी टीका सुप्रिया सुले यांनी राज्य सरकारवर केली.