महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी ठाणे

थर्टीफर्स्टच खर्च टाळत,फुटपाथ वरील लोकांना तरुणांनी केले ब्लॅंकेट वाटप

नेशन न्युज मराठी टीम.

कल्याण– थर्टीफर्स्ट म्हणजेच 31 डिसेंबर म्हणजे जुने वर्षाचा शेवटचा दिवस. वर्षाचा हा शेवटचा दिवस अनेक जण नवीन वर्षाचे स्वागत आपापल्या पध्दतीने करतात. मग काही जण आपल्या मित्र मंडळींसोबत जंगी पार्टीद्वारे सेलिब्रेशनचे कार्यक्रम आखातात तर काही जण पर्यटन स्थळी जाऊन आपल्या कुटुंबियांसमवेत वेळ घालवतात. पण कल्याणातील काही संवेदनशील तरुणांनी साजरा केलेला थर्टीफर्स्ट मात्र काहीसा वेगळा आहे आणि इतरांसाठी प्रेरणादायी असाच ठरला. थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनला टाळत, त्याच खर्चातून गोर गरिबांचे रक्षण करण्याचे काम या तरुणांनी केले आहे
कल्याणातील तेजस सांगळे या युवकाने आणि त्याच्या मित्रांनी आपल्या कृतीतूनही सिद्ध केले. सध्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडेही थंडी आणि गारवा जाणवत आहे. अशा गारव्यात फुटपाथ किंवा झोपडपट्टीत राहणारे अनेक जण कुडकुडत दिवस काढत आहे. नेमका हाच धागा पकडून तेजस आणि त्याच्या मित्रांनी एकत्र येत जमा केलेल्या पैशांतून या गोर गरिबांना ब्लॅंकेट वाटप केले. कल्याण पश्चिमेतील स्टेशन रोड, पत्रीपुल आणि बाजूचा परिसर,आधारवाडी झोपडपट्टी आदी 7 ते 8 ठिकाणी गरजू व्यक्तींना हे ब्लॅंकेट वाटप केल्याचे तेजसने सांगितले.

या स्तुत्य सामाजिक उपक्रमासाठी मुकुल सोनटक्के, शुभम शुक्ल, सुधीर शेट्टी, अमृता मोतीवाले यांच्यासह अनेकांनी आपला हातभार लावला. तर स्थानिक पोलिसांनीही या उपक्रमासाठी सहकार्य केले. दरम्यान तेजस आणि त्याच्या मित्रांनी या सामाजिक उपक्रमातून माणुसकी दर्शन घडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×