Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
मुख्य बातम्या राजकीय

विचार करुन मतदान करा,हे शेवटचे मतदान असणार आहे-प्रियंका चतुर्वेदी

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

मुंबई/प्रतिनिधी – वाढत्या उन्हाच्या पाऱ्याबरोबर लोकसभा निवडणुकीचे वातावरण फार तापल्याचे दिसत आहे. आरोप प्रत्यारोपा बरोबरच नेते मंडळी रोज नवनवीन खुलासे करत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील खासदार प्रियंका चतुर्वेदी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. प्रियंका चतुर्वेदी या वारंवार बीजेपी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना दिसतात. त्याचप्रमाणे मोदी सरकार हे लोकशाही ला घातक असल्याचे त्या सांगत असतात.

“देशातील यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांना तुरुंगात पाठवा किंवा त्यांना आपल्या बाजूने घ्या. आधी चंदीगड, मग रामटेक, मग खजुराहो याठिकाणच्या उमेदवारांना अपात्र करण्यात आले. सुरत मध्ये भाजपचा उमेदवार बिनविरोध आणि निवडणुकीशिवाय निवडून आला आहे. ही भारतीय जनता पार्टीची रणनीती आहे.” अशी टीका खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदी सरकारवर केली. तसेच त्यांनी मतदारांना आवाहन केले कि विचार करुन मतदान करा. कारण हे आपलं शेवटचं मतदान असणार असल्याचे प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

Translate »
X