नेशन न्यूज मराठी टिम.
नाशिक/प्रतिनिधी– नाशिक मध्ये काही दिवसांपूर्वी तलाठी परीक्षा झाली. दिंडोरी रोडवरील एका परीक्षा केंद्राजवळ हायटेक यंत्रणेच्या माध्यमातून तलाठी परीक्षेच्या पेपरची माहिती देताना नाशिक पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले होते. यात पोलिसांना तपासादरम्यान आणखी काही माहिती हाती लागली आहे. तलाठी भरती परीक्षा घोटाळ्यातील मुख्य संशयित आरोपी याच्या मोबाईल मध्ये वन विभागाच्या प्रश्न पत्रिका सापडल्या आहेत. तसेच या आरोपीने इतर परीक्षेत देखील गैरव्यवहार केल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हा सगळा तपास सुरू असताना DMER परीक्षेचा निकाल लागला. त्या निकालामध्ये गणेश गुसिंगे याच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे या परीक्षेत घोटाळा झालाय का, याचाही तपास केला जाणार आहे. या सगळ्या प्रकरणाची नाशिक पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, त्यादृष्टीने तपास सुरू केलाय. अशी माहीती किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त, नाशिक शहर यांनी दिली. त्यामुळे परीक्षा घोटाळ्यातील मुख्य आरोपी गणेश गुसिंगे याच्या अडचणीत वाढ होणार आहे.