नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
अमरावती/प्रतिनिधी – संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची दुमचक्री सुरू झाली आहे. सर्वच पक्ष मोठ्या ताकदीने सभा घेत जन समुदाय आपल्या कडे ओढण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यातच महाविकासआघाडीचे उमेदवार असलेले बळवंत वानखेडे यांच्या प्रचार सभा घेण्यात आली. त्यात शिवसेनेच्या स्टार प्रचारक सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर चांगलीच तोफ डागली, त्यांनी सांगितले की आता देशात मोदीची लाट नाहीच आहे. कारण अमरावतीत उन्हाची एवढी मोठी लाट असताना सामान्य उमेदवारासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा जनसमुदाय जमणे ही फार मोठी गोष्ट आहे. हुकूमशाहाच्या जोखडातून देशाला मुक्त करण्यासाठीची लाट आहे अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.
एकीकडे कोल्हापूर संस्थानाला महाविकास आघाडीचे सगळे नेते जाऊन सन्मानाने त्यांना उमेदवारी देतात तर दुसरीकडे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसदारांना चार-चार दिवस दिल्ली येथे अमित शाह मोदी भेटत नाहीत. त्यांना ताटकळत राहावे लागते. एवढेच नव्हे तर नरेंद्र मोदी, अमित शाह हे देवेंद्र फडणवीस पण चार-चार दिवस ताटकळत ठेवतात. परंतु, एका तासाच्या आत ज्यांना उमेदवारी आधी जाहीर झाली नंतर त्याचा पक्ष प्रवेश झाला त्यांना मात्र एका तासात अमित शाह हे भेट देतात. यावरून देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा नवनीत राणा यांची ताकद जास्त वाढतेय काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. सत्ता केंद्र अमरावती तर होत नाही? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.
नवनीत राणा यांच्यावर माझ वैयक्तिक रोष नाही. परंतु, मला असं वाटतं ज्यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. एकीकडे बर्वे यांचे जात प्रमाणपत्र एका दिवसात रद्द होते आणि दुसरीकडे वर्षानुवर्षे नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निर्णय प्रलंबित असूनही तथाकथित महाशक्तीने उमेदवारी दिली, हे निश्चितच कुठेतरी खेदजनक आहे. न्यायालयाचा निर्णय आपल्याच बाजूने लागणार जणू भाजपला हे कळून चुकले की काय? अशी शंका येत आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली