नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई / प्रतिनिधी – उत्तर दायित्व सभेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ह्यांच्या बाबत काही नेत्यांनी चुकीची वक्तव्य केली. त्याला उत्तर देताना महेश तपासे , राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते, शरद पवार गट माध्यमांशी बोलताना म्हणाले कि, काल झालेली सभा ही उत्तर दायित्व सभा असे सांगितले जाते,पण सर्व नेत्यांची भाषणं जर ऐकली तर असे लक्षात येत की ती सभा उत्तर सभा होती.
शरद पवार ह्यांच्या बाबत बोलताना नेत्यांनी विचार करायला हवाय. शरद पवार यांनी खूप माणसे मोठी केली, पवार साहेबांनी किती लोकांसाठी काय काय केले. शरद पवार हे युपीए ,महाविकास आघाडी ,तसेच इंडिया चे नेते आहेत. शरद पवार यांना तेव्हा ही पोलिटिकल टार्गेट केलं जातं होतं आणि आज ही टार्गेट केलं जातं.
लोकशाहीचे चे जतन करण्यासाठी आमची बारगिनींग पावर अधिक वाढली आहे. सत्तेसाठी लोक पक्षाच्या विरोधी भुमिका घेतात हे आपण पाहतोय. शरद पवार यांच्या भूमिकेबद्दल संशय घेण्याचं कारण नाही. २०२४ च्या निवडणूकीला आम्ही इंडिया आघाडी सोबत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.