मुंबई/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला आज २० मे रोजी सुरुवात झाली. मतदानासाठी मतदारांना निवडणूक आयोगाने सुरक्षितेच्या दुष्टिने वेगवेगळ्या अटी घातल्या आहे. त्यातच मतदारांना मतदान करतेवेळी मतदान केंद्राच्या आत बॅग आणि मोबाईल नेण्यास मज्जाव केला आहे.
मतदानाच्या सुरक्षितेच्या दुष्टिने ती आट बरोबरही असेल पण मुंबई येथील गोरेगाव येथे या अटी मुळे कामावर जाणाऱ्या कित्येक कामगार वर्गाने बॅग आणि मोबाईल ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याने मतदान न करताच कामावर जाणे पसंत केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारी वर परिणाम होऊ शकतो असे तिथे असलेल्या काही सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले आहे. या जाचक अटींमुळे मतदानापासून वंचितगोरेगावात मतदाना करण्यासाठी असंघटित कामगार महिला युवक मोठ्या प्रमाणात बाहेर पडले असताना निवडणूक आयोगाची जाचक अटी मोबाईल आणि बॅग घेऊन जाण्यास परवानगी नाही बॅग आणि मोबाईल ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने कामगार वर्ग मतदार मतदान न करता कामाला जात आहे आणि मतदानापासून वंचित राहत असून या शुल्क कारणांमुळे मतदानाची टक्केवारी कमी होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
त्याच बरोबर निवडणूक आयोगाला विनंती केली आहे की ही आट शिथिल करून मोबाइल बंद करून आपल्या सोबत घेऊन जाऊ द्यावा तसेच बॅग मतदान खोलीच्या बाहेर ठेवण्यास परवानगी द्यावी. अन्यथा मतदान टक्केवारी वर परिणाम होऊन मतदान कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.