NATION NEWS MARATHI DIGITAL.
जळगाव/प्रतिनिधी – पावसाळा जवळ आल्याने शेतकरी राजा शेतीची मशागत करण्यामध्ये मग्न आहे. शेतीकामासाठी बैल जोडी महत्वाची असल्याने शेतकरी शेतीच्या कामासाठी बैल जोडी घेण्यासाठी व विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करतांना दिसत आहे. खरीप पूर्व मशागतीसाठी शेतकरी शेतात मशागत करत असतात त्यासाठी शेतकरी बैल जोडी खरेदी करत असतात. बरेच शेतकरी शेतात ट्रॅक्टर व यंत्रणाच्या साह्याने मशागत करत असतात परंतु ट्रॅक्टर पावसाळ्यात चालत नसल्याने त्याच बरोबर ट्रॅक्टर घेणे ज्या शेतकऱ्यांना आर्थिक करणा मुळे परवडत नाही अशे शेतकरी शेतातील काम बैल जोडीने करतात, त्यासाठी बैल जोडी शेतकरी घेताना दिसत आहे.
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत बैल बाजार मोठ्या प्रमाणावर भरत असतो साठ हजारापासून लाखाचा वर बैल जोडी या ठिकाणी मिळतात त्यामुळे जिल्हा भरातून व जिल्हा बाहेरून शेतकरी बैलजोडी घेण्यासाठी या ठिकाणी येतात.त्यामुळे बैल विक्रीतून या ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल येथे होताना दिसते.