नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – शेजारच्याच घरात चोरी केल्याची खळबळजनक घटना ओशिवरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या यमुना नगर मध्ये घडली आहे. दोन इसम मुखवटा घालून घरात चोरी करत होते. घरात सीसीटीव्ही असल्यामुळे मालकाने घरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केला. त्यात दोन इसम चोरी करताना आढळून आले. 26 डिसेंबर रोजी ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्हीची पाहणी केली. ज्या इसमाने चोरी केली आहे, त्याच्या पायात चप्पल नसल्याचे आढळून आले. म्हणून चोर हा बिल्डिंग मध्येचं राहणारा असल्याचा पोलिसांना संशय आला.
शेजारीचं राहणारा मारुश मोटवानी हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये असणाऱ्या सारखाच दिसत असल्याने त्यांची चौकशी केली असता त्याने कबुली दिली. मारुश मोटवानी याचा मित्र प्रदीप कोरेजा याची मदत घेऊन बनावट चावी बनवून रूममध्ये प्रवेश केला. घरातील दागिने व काही रोख रक्कम असा ऐवज चोरी केल्याचे सांगितले. या दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे 23 लाख 40 हजार रुपये ऐवज जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.