महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी व्हिडिओ

डोंबिवलीत मसाल्याच्या गोदामात चोरी,घटना सीसीटिव्हीमध्ये कैद

प्रतिनिधी.

डोंबिवली – ३१ डिसेंबरच्या पहाटे सुनीलनगर मधील एका मसाल्याच्या गोदामात शटर उचकटून चोरट्याने तब्बल १५ हजार रुपयांची चिल्लर आणि ५ हजार रुपयांचे मसाले,पापड,लोणची चोरल्याची घटना घडली.ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली असून याप्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ३१ डिसेंबरच्या पहाटे पावणे चारच्या सुमारास सुनीलनगर येथील मच्छिंद्र कुटे यांच्या गोडाऊनवर मास्क घालून आलेल्या चोरट्याने शटर उचकटले. गोदामात जाऊन तब्बल १५ हजार रुपयाची चिल्लर, मसाले पापड आणि लोणची यांच्या पाकटे चोरली.चोरीचा हा प्रकार गोदामातील सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. रामनगर पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे.

Translate »
×