महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image इतर थोडक्यात

कार्यकर्त्यांचा जल्लोष, पण रुग्णवाहिकेतील चिमुकल्यांचा जीव टांगणीला

नेशन न्यूज मराठी टीम.

अमरावती/प्रतिनिधी – कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीची मतमोजणी विदर्भ विज्ञान महाविद्यालयात मध्ये सुरू होती. या निवडणुकी मध्ये महाविकास आघाडीच्या पॅनलने बाजी मारली आहे. त्यामुळे मतमोजणी कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी शेकडो कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर जमले होते. त्यामुळे या परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ट्रॅाफिक जाम झाले होते. कार्यकर्ते जल्लोषात इतके मग्न होते, की त्यांच्यामुळे झालेल्या ट्रॅफिकमध्ये एक रुग्णवाहिका अडकल्याचे भानही या कार्यकर्त्यांना राहिले नाही.
रुग्णवाहिकेत दोन चिमुकली मुले होती. जवळपास तासभर रुग्णवाहिका ट्रॅाफिकमध्ये अडकल्याने चिमुकल्यांचा जीव टांगणीला लागला होता .सुदैवाने चिमुकले रुग्ण होते ते सिरिअस नव्हते नाहीतर या जल्लोषाने एखाद्या निरपराध जीवाचा बळी घेतला असता. आपण कोणतेही कार्यक्रम करताना रस्त्याला आडथळा होईल, वाहतूक कोंडी होणार नाही याचे भान नागरिक कार्यकर्त्यांनी ठेवले पाहिजे नाहीतर आपल्या या बेशिस्त वागण्याची शिक्षा रुग्णवाहिकेत असणाऱ्या निरपराध जीवाला भोगावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×