नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २ खासदार आणि ४ आमदार आहेत. परंतु १ आमदार आणि १ खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची कामे सुरु असल्याचं मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितलं आहे. सोमवारी ठाणे जिल्हा समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सुरु होती. यावेळी मनसे आमदार राजू पाटील यांनी हा संताप केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्यासमोर व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी या महत्वाकांक्षी योजनेत कल्याण डोंबिवली महापालिकेचा समावेश करण्यात आला आहे. मात्र या योजनेतील विकास काम हि एक आमदार एक खासदार यांच्याच मतदारसंघात सुरु असल्याचे दिसून आले आहे.सध्या कल्याण डोंबिवली परिसरात स्मार्ट सिटीच्या विकास कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. मात्र अन्य आमदारांच्या मतदारसंघांना वगळून एक आमदार एक खासदार यांच्याच मतदारसंघात स्मार्ट सिटीची काम सुरू असल्याने मनसे आमदार राजू पाटील, भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानकाला सॅटीस स्मार्ट सिटी अंतर्गत बनवण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. फक्त ठराविक मतदारसंघांकडे लक्ष देऊन अन्य विधानसभा क्षेत्रांकडे सुर्लक्ष होत असल्याने उपस्थित दोन्ही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांमध्ये केंद्र शासनाच्या अमृत योजनेचं काम सुरू आहे. मात्र हे काम करत असताना ठेकेदाराने रस्ते खोदून जलवाहिन्या टाकल्या आहेत. त्यामुळे शासनाने तयार केलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या ठेकेदाराची जबाबदारी आहे, कि रस्त्याची दुरुस्ती करून देणं अशी माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तसेच संबंधीत ठेकेदाराच्या कामाचा देखील ऑडिट करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी बैठकीत केली आहे. त्यानुसार या कामाचा लवकरच स्ट्रक्चरल ऑडिट केल जाणार असल्याची माहिती केडीएमसी कडून देण्यात आली आहे. स्थानिक आमदारांना घेऊन सुरु असलेल्या अमृत योजनेच्या कामाचा दौरा करण्याच्या सूचना देखील केंद्रीय मंत्र्यांनी दिल्या आहेत.
कल्याण रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या लोकग्राम ब्रिजचे काम हे धीम्या गतीने सुरु आहे. या पुलाची उभारणी हि रेल्वे कडून करण्यात येणार असून त्या संबंधीतीलं रक्कम कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रेल्वेला सुपूर्द करण्यात आली आहे. मात्र या संदर्भात रेल्वेकडे पाठपुरावा केला जात नसल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. या नंतर तातडीने या संदर्भात कल्याण डोंबिवली महापालिका पाठपुरावा करेल असं आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहे.केडीएमसी,एमएमआरडीए आणि रेल्वे प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हे काम संथ गतीने सुरु आहे.
सोमवारी झालेल्या दिशा बैठकीत मनसे आमदार राजू पाटील यांनी दिव्यातील समस्यांचा पाढा केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या समोर मांडला. यामध्ये प्रामुख्याने दिवा डम्पिंग,भंडार्ली डम्पिंग,स्वच्छता गृह, वाहतूक कोंडी, अर्धवट पूल आधी समस्यांचा पाढा वाचला. या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून दिव्याकडे लक्ष द्यायला हवं असं सूचित देखील ठाणे मनपाच्या अधिकाऱ्यांना करून दिले आहे.
Related Posts
-
आयुक्तांकडून एकही काम होत नाही,पुढच्या वेळेस दाढी लावून येतो - मनसे आमदार राजू पाटील
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - आयुक्तांकडे घेऊन गेलेले एकही काही काम झालं नसल्याने…
-
नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचेच नाव- मनसे आमदार राजू पाटील
डोंबिवली/प्रतिनिधी- नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच…
-
आमदार राजू पाटील यांच्याकडून कल्याण - शिळ रस्त्याच्या कामाची पाहणी
डोंबिवली/प्रतिनिधी- कल्याण - शिळ रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामाची आमदार राजू पाटील…
-
डोंबिवलीतील मेळाव्यात आमदार राजू पाटील यांचे मनसे कार्यकर्त्यांना कानमंत्र
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली- एक कोणी तरी गेलं म्हणून…
-
१४ गावांचे श्रेय ग्रामस्थांच्या एकजुटीला - मनसे आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट…
-
कोविड हा आजार होता, नंतर त्याचा बाजार केला - आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली - डोंबिवली विभा कंपनीच्या जागेत…
-
नालेसफाईबाबत ठाणे मनपा सुस्त,आमदार राजू पाटील यांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. https://youtu.be/X7RG4-rilAU?si=0XUZ85q73jqhcyYS ठाणे/प्रतिनिधी - पावसाळा सुरू…
-
मनसे आमदार प्रमोद(राजू )पाटील यांच्याकडून अंबरनाथ मधील कोविड सेंटरला पिपीई किटचे वाटप
प्रतिनिधी. अंबरनाथ - कोरोनाच्या या भयंकर काळात संकटाचा सामना करण्यासाठी…
-
पथदिव्यांची बत्ती गुल,अंधेर नगरी चौपट राजा - मनसे आमदार राजू पाटील यांचा टोला
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण- केडीएमसीच्या ग्रामीण भागातील पथदिव्यांचे बिल…
-
नुसती रस्त्याची कामे काढणे म्हणजे विकास नाही - आमदार राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील खराब रस्ते…
-
नवीन गाड्यांचे नियोजन करून कोकण वासियांचा प्रवास सुखकर करा -आमदार राजू पाटील
कल्याण ग्रामीण/प्रतिनिधी -गौरी गणपती निमित्त मुंबई सह उप नगरातून कोकणात…
-
२७ गावांची कर आकारणी नवी मुंबई महापालिकेच्या धोरणाप्रमाणे करा - आमदार राजू पाटील
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - नवी मुंबईतील काही गावांमध्ये…
-
दिबांच्या नावाला केलेल्या विरोधाचे परिणाम लवकरच दिसणार- आमदार राजू पाटील
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गेली इतकी वर्षे शिवसेनेकडून कल्याण डोंबिवलीच्या विकासाऐवजी…
-
दिव्याच्या विकासावरून राजकीय नेत्यांवर आमदार राजू पाटील आक्रमक, दिव्याचा वासेपूर केल्याचा दिला टोला
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/JvC41ISiJpg कल्याण ग्रामीण/प्रतिनिधी - बाळासाहेबांची शिवसेना…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेने रिंगरोड आणि इतर प्रकल्पांसाठी डम्पिंग ग्राऊंड केले बंद - आमदार राजू पाटील
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिकेने रिंगरोड आणि इतर प्रकल्पांसाठी…
-
खड्डे भरा अन्यथा तुम्हालाच खड्ड्यात भरू - मनसे आमदार राजू पाटील यांचा इशारा
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण-डोंबिवली महापालिकेचा चक्की नाका ते नेवाळी दरम्यानच्या…
-
डोंबिवली-मुंब्रा रेल्वे समांतर रस्त्याच्या मंजुरीसाठी आमदार राजू पाटील यांची आधिवेशनात लक्षवेधी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/ संघर्ष गांगुर्डे - गेल्या…
-
सगळ्यांना एकत्र घेऊन इथली काम कशी होतील याचा प्रामाणिक प्रयत्न करणार -आ. राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - डोंबिवली एमआयडीसी निवासी…
-
जी तत्परता कोपर पुलावरील खड्डे बुजबण्यासाठी दाखवली त्याच तत्परतेने इतर खड्डे बुजवा - मनसे आमदार राजू पाटील
डोंबिवली/प्रतिनिधी - मंगळवारी लोकार्पण झालेल्या कोपर पुलावर खड्डे पडण्यास सुरुवात…
-
चांगला सण आहे आम्हाला आमचे तोंड कडू करायचे नाही मनसे आमदार राजू पाटील यांचा सरकारला टोला
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे- दिवाळीनिमित्त डोंबिवलीकरांसाठी उत्सव प्रकाशाचा हा मनसेतर्फे विद्युत रोषणाईचा…
-
उपलब्ध रोजगारामध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य द्या व परप्रांतात गेलेल्या मजुरांची वैद्यकीय तपासणी करूनच राज्यात घ्या - मनसे आमदार राजू पाटील
प्रतिनिधी . कल्याण : सत्तेतील काही खासदार परप्रांतीयांचे लांगुलचालन करून…
-
चाळीस वर्षें दिली, आणखी एक महिना देऊन पाहू- मनोज जरांगे पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. जालना / प्रतिनिधी - मराठा समाज…
-
एक विद्यार्थी एक रोप कल्याणच्या नूतन विद्यालयाचा अनोखा उपक्रम
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण…
-
पहिल्या महिला उपमहाराष्ट्र केसरीला चांदीची गदा,आ. राजू पाटील यांच्याकडून सन्मान
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे- राज्यातील पहिल्या महिला महाराष्ट्र…
-
कल्याण-डोंबिवली शहराच्या वाटोळ्याला भाजपाही जबाबदार-मनसे आ. राजू पाटील
प्रतिनिधी. कल्याण - डोंबिवली एमआयडीसी व लगतच्या ९ गावांमध्ये सुधारित…
-
नाशिकच्या धर्तीवर बॉटनिकल गार्डनचा प्रयत्न करणार - मनसे आ.राजू पाटील
प्रतिनिधी. डोंबिवली - डोंबिवली परिसरामधील मौजे धामटण, दावडी , उंबार्ली,…
-
राज्यात एक देश एक रेशन कार्ड योजनेची प्रभावी अंमलबजावणी
मुंबई प्रतिनिधी - सर्वसाधारणपणे राज्यात दरमहा सात लाख शिधापत्रिकांवर जिल्हांतर्गत…
-
भंडार्ली डम्पिंग बाबत मुख्यमंत्री सपशेल फेल ठरले- आ. राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/ प्रतिनिधी- गावांमधील भंडार्ली गावच्या…
-
कोकण वासियांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आ. राजू पाटील यांचे रेल्वे मंत्र्यांना पत्र
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे - प्रतिनिधीगणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी…
-
राज्यात सत्ता संघर्षाचा वाद विकोपाला मात्र आ. राजू पाटील नागरिकांच्या समस्या सोडवण्यात व्यस्त
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे - राज्यात सुरू…
-
प्रशासकीय राजवटीत किती अनधिकृत बांधकामे झाली त्याच ऑडिट करा-आमदार राजू पाटिल
नेशन न्युज मराठी टीम. डोंबिवली - कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बांधकामांचा…
-
मनसे आ.राजू पाटील यांनी घेतली एमआयडीसी,केडीएमसी आणि पिडब्लूडीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक
प्रतिनिधी. डोंबिवली - गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना डोंबिवली…
-
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील समस्यांचा मुख्यमंत्र्यांसमोर आ. राजू पाटील यांनी वाचला पाढा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/ प्रतिनिधी - महाराष्ट्र नवनिर्माण…
-
अन्यथा २७ गाव आणि पलावा मधील नागरिक कर भरणार नाहीत - आमदार राजू पाटिल
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण ग्रामीण/संघर्ष गांगुर्डे- कल्याण डोंबिवली महापालिका…
-
उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागा कडून एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उद्योग आणि अंतर्गत…
-
सह्याद्री ते हिमालय पायी प्रवास,एक झाड माणुसकीचं एक पाऊल परिवर्तनाचं
भिवंडी/प्रतिनिधी - रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून अंधेरी…
-
आयुक्तांच्या नावापुढे डॉक्टर खासदार डॉक्टर पण लोकांच्या नडीची नस यांना सापडली नाही- आ. राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी- एका महिलेला स्कायवॉकवर प्रसूती वेदना…
-
काँग्रेस आमदार पी.एन.पाटील यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी दुःखद निधन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कोल्हापूर/प्रतिनिधी - काँग्रेसचे एकनिष्ठ नेते…
-
केडीएमसी क्षेत्रात लावण्यात आलेले कोरोना निर्बंध हटवा,मनसे आ.राजू पाटील यांची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कोरोना आटोक्यात आल्याने राज्य शासनाने…
-
डोंबिवली ही सासुरवाडीआहे, सांभाळायाला हवी, आ. राजू पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / संघर्ष गांगुर्डे - एकीकडे…
-
विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची आ. राजू पाटील यांची मागणी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - ठाणे रायगड जिल्ह्याच्या…
-
२७ गावातील पथदिव्यांसाठी रुपये २७.९० कोटी मंजूर,आ. राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला आले यश
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण ग्रामीण/ प्रतिनिधी - कल्याण…
-
जरांगे उपोषण,मनसे आ. राजू पाटील यांनी सरकारचे टोचले कान, फोडाफोडीच्या राजकारणातून उसंत घेण्याचा दिला सल्ला
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रात मराठा…
-
२७ गावातील रेरा फसवणूक प्रकरणात अधिकाऱ्यांना देखील दोषी धरा -आ.राजू पाटील
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या…