नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे फडणवीस गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आला त्याच प्रमाणे मोठ मोठे पोस्टर लावून तो व्यक्त करण्यात आला तर उद्धव गटाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया खुलासा करण्यात आला. एकंदरीत दोन्ही बाजूचे वातावरण ढवळून निघाल्याचे दिसून आले आहे. त्याच बरोबर आता उद्धव ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार विधानसभा अध्यक्ष यांना निवेदन देण्यात येणार आल्याचे आ. सचिन अहिर यांनी सागितले आहे.त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लवकरात लवकर विधानसभा अध्यक्ष यांनी कृती करावी अशी भूमिका माडण्यात येणार आसल्याचे अहिर यांनी सागितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ कोणीही काही ही घेऊ द्या.आम्ही आमच्या पध्दतीने आमची जी काही भुमिका आहेती मांडू. इतरांना काय बोध घ्यायचा आहे ते घेतील.असा खोचक टोला माध्यमांशी बोलताना आ.सचिन आहिर यांनी विरोधकांना लगावला.त्याच बरोबर ते हेही म्हणाले कि स्पिकरने कोणत्याही निर्णयाबाबतीत भाकित करणं हे उचित नाही.विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लंडन वरुन आल्यानंतर आमचे नेते किंवा वकिल युक्तीवाद करतील.सगळे दौरे सोडुन अध्यक्षांनी मुंबईत यायला हवं होत.आज ते येणार आहे अशी माहिती आहे असे त्यांनी सागितले.
मुंबई महानगरपालिका निवडणुक पुढे ढकलण्याचे सरकारचे काम सुरु आहे. एवढी मोठी महानगर पालिकेची निवडणूक हे सरकार का घेत नाही. अनेक महानगर पालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहे हा या सरकारचा डाव आहे सत्ताधारीच प्रशासनाच्या विरोधात बोलायला लागले आहेत.जे काल पर्यंत आम्ही बोलत होतो तेच आज सत्ताधारी बोलत आहेत.मुंबई महानगरपालिकेत सुरु असलेला भ्रष्टाचार थांबवला पाहिजे. महापालिकेच्या भ्रष्टाचारावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री का लक्ष घालत नाही ? का बोलत नाही असा सवालहि सरकारला अहिर यांनी केला.