नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली आणि इतर रेल्वस्थानकावर आपले सावज शोधून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय आहे . रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसलेल्या महिला प्रवाशाची नजर चुकवून सोन्याचे मंगळसूत्र असलेली पर्स चोरणाऱ्या चोरट्या महिलेला कल्याण गुन्हे रेल्वे शाखेने अटक केली आहे. कविता डूमरे असे या चोरट्या महिलेचे नाव आहे. सीसीटिव्हीं फुटेजच्या आधारे टिटवाळा येथून तिला अटक करत तिच्याकडून चोरलेले सात तोळ्याचे तब्बल सव्वा चार लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र हस्तगत केले आहे.
चोरी करणारी महिला सराईत चोरटी आहे का त्याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे .ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्मवर बसलेल्या एका महिलेची नजर चुकवून सोन्याचे मंगळसूत्र असलेली पर्स चोरून एक महिला पसार झाली होती. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. डोंबिवली रेल्वे पोलिसांसह कल्याण रेल्वे गुन्हे शाखा देखील या गुन्ह्याचा समांतर तपास करत होती. ठाकुर्ली स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही तपासत या महिलेची ओळख पटवण्यात आली. तांत्रिक माहितीच्या आधारे ही महिला टिटवाळा येथील रहिवासी असल्याचे माहिती समोर आली.
रम्यान कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने टिटवाळा येथे जाऊन या महिलेला बेड्या ठोकल्या. तिच्याकडून सव्वाचार लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. तिने या आधी देखील अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का? याचा तपास कल्याण रेल्वे गुन्हे शाखा करत आहे.