नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
ठाणे/प्रतिनिधी – नाशिक स्थित डॉक्टरच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेला मोठ्या शिताफीने ठाण्यात खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहे. खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर पोलिस निरीक्षक शेखर बागडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, नेहा जाधव रा. बाळकुम, ठाणे ही महिला नाशिक स्थीत व्यवसायाने डॉक्टर असलेल्या इसमाची सुपारी देवुन खुन करण्यासाठी मारेकऱ्याचे शोधात आहे. त्यावेळी त्यांनी बनावट मारेकरी म्हणून एका इसमास पाठवुन मिळालेल्या बातमीची खातरजमा केली. त्यानंतर नेहा जाधव यांनी बनावट मारेकरी म्हणून पाठविलेल्या इसमास नाशिक स्थित डॉक्टर किरण बेंडाळे यांचा खुन करण्यासाठी तीन लाख रूपयात सुपारी देवुन, किरण बेंडाळे यांचा फोटो, काम करण्याचे ठिकाणाची माहिती, विषारी इंजेक्शन, सिरींज बनावट मारेकऱ्यास दिले. अशाप्रकारे बनावट मारेकऱ्याची नेहा जाधव यांच्या विरोधात फिर्याद घेवुन कापुरबावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं. 82/2024 भादवि कलम 115 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर महिला आरोपीस तिच्या राहत्या घरातून अटक करण्यात आले. तिला न्यायालयात हजर केले असता सदर महिलेची दिनांक 24/01/2024 पर्येंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आली आहे.या महिलेकडे अटकेनंतर करण्यात आलेल्या तपासात सदर महिलेचे डाॅ. किरण बेंडाळे रा. नाशिक यांचेबरोबर मैत्रीपुर्ण संबंध होते. त्याचा फायदा घेवुन सदर महिला ही डाॅक्टर किरण बेंडाळे यांना ब्लॅकमेल करून 50 लाख रूपये खंडणीची मागणी करीत होती. सदर रक्कम न दिल्यास त्यांना जिवे ठार मारण्याची वारंवार धमकी देत होती असे तपासात निष्पन्न झाले आहे.खंडणी विरोधी पथकाने वेळीच कारवाई केल्यामुळे अनर्थ टळला आहे. त्यामुळे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची कारवाई मा. डाॅ. पंजाबराव उगले, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, मा. शिवराज पाटील, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे शहर, मा. राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, शोध 2, गुन्हे शाखा, ठाणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहरचे वपोनि/शेखर बागडे, मपोनि/वनिता पाटील, सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/श्रीकृष्ण गोरे, सपोनि/भुषण कापडणीस, पोउनि/विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडे, पोहवा/संजय राठोड, सपोउनि/संजय बाबर, पोहवा/सचिन शिंपी, मपोहवा/शितल पावसकर, मपोशि/मयुरी भोसले, पोशि/अरविंद शेजवळ, चापोना/भगवान हिवरे यांनी केली आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.