रत्नागिरी/प्रतिनिधी – कोकणात कडक उन्हाळ्यात कोसळणारा धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. लांजा तालुक्यातील वेरवली बेर्डेवाडी येथे लघु पाटबंधारे विभागाचे धरण आहे. या बेर्डेवाडी धरणावर एक धबधबा आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यातही हा धबधबा ओसंडून वाहत आहे.
वेरवली, वेरवली खुर्द, पडवणवाडी या भागात पाणीटंचाई आहे. त्यामुळे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. या धरणावरील धबधबा प्रवाहित झाला आहे. उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्यामध्ये पर्यटक मनमुराद आनंद लुटत आहेत.धबधब्यात डुंबण्याचा आनंद घेत या स्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ऐन उन्हाळ्यात या धबधब्यामुळे पर्यटक सुखावले आहे. बच्चे कंपनी सुद्धा याचा आनंद लुटत आहे.