Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे महत्वाच्या बातम्या

नगरविकास मंत्री यांनी घेतला सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा

नेशन न्युज मराठी टीम.

ठाणे – नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेऊन नवी मुंबई मेट्रोनेरुळ व बेलापूर जेट्टीसह इतर प्रकल्पांना भेटी दिल्या. सिडकोच्या वतीने सुरू असलेले प्रकल्पांचा दर्जा राखून ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.नगरविकास मंत्री शिंदे यांनी आज भाऊचा धक्का ते नेरूळ जेट्टी दरम्यान बोटीने प्रवास करून शिवडी – न्हावा शेवा सागरी सेतू प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नेरूळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जेट्टीची पाहणी केली. त्याच ठिकाणी त्यांनी सिडकोच्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला.

सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी सिडकोच्या वतीने सुरू असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. प्रधानमंत्री आवास योजना तसेच सिडकोच्या आवास योजनेतील घरांचे बांधकामप्रस्तावित नावडे येथील टाऊनशिपनवी मुंबई विमानतळनैना विकास आराखडानेरुळ जलवाहतूक टर्मिनलनेरूळ बेलापूर-खारघर सागरी मार्गपाणी पुरवठा योजनासांडपाणी पुर्नप्रक्रियाखारघर येथील सेंटर ऑफ एक्सलन्सवाशी येथील ठाणे खाडीपूलपालघरमधील प्रशासकीय इमारती आदी प्रकल्पांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

नगरविकास मंत्री. शिंदे म्हणाले कीदेशातील सर्वात उत्कृष्ट अशा इमारती सिडकोने पालघर मुख्यालयाच्या रुपाने उभारल्या आहेत. पालघरप्रमाणेच नवी मुंबईतील प्रकल्पांची कामे दर्जेदार तसेच वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. सिडकोच्या वतीने उभारण्यात आलेल्या व पुढील काळात उभारण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर सरकत्या जिन्याची सोय करण्यात यावी. सिडकोच्या विविध प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात नवी मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. या प्रकल्पांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

नेरुळ येथील जेट्टीच्या पाहणीनंतर पालकमंत्री शिंदे व खासदार राजन विचारे यांनी बेलापूर येथील जेट्टीला भेट दिली. त्यानंतर त्यांनी खारघरमधील सेंट्रल पार्क मेट्रो स्थानक येथे भेट देऊन मेट्रोची पाहणी केली. तसेच सेंट्रल पार्क मेट्रो स्थानक ते पेंधर मेट्रोस्थानक असा प्रवासही त्यांनी मेट्रोमधून केला. या प्रवासादरम्यान त्यांनी मेट्रोच्या कामाची माहिती घेतली. नवी मुंबई मेट्रोच्या या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करून हा मार्ग लवकरात लवकर सुरूवात करावाअशा सूचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना केली. पालकमंत्री शिंदे यांनी खारघर येथे सुरू असलेल्या सेंटर ऑफ एक्सलन्स सेंटरच्या प्रकल्पास भेट दिली. या प्रकल्पामुळे नवी मुंबई च्या क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार राजन विचारेविजय नहाटानवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगरनवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंहसिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदेएस. एस. पाटीलपनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह सिडकोचे अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X