नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोबिवली महानगर पालिकेत केंद्र व राज्य शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा चुराडा करून स्मार्ट सिटीचे प्रकल्प सुरू आहेत. दोन दिवसा पासून केंद्रिय मंत्री अनुराग ठाकुर यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण डोंबिवली शहरात दौरा केला असता त्यांना डोंबिवलीतील खराब रस्त्याचा अनुभव आला, त्यातच शहरातील अस्वछतेचे दर्शन झाल्याने पालिकेतील विविध प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी केंद्रिय मंत्र्यांनी पालिका आयुक्तांची घेतलेल्या भेटीत त्यांनी केडीएमसी तील रस्त्याची दुरवस्था आणि स्वच्छतेची अवस्था पाहून केंद्रीय मंत्री संभ्रमित झाले असून त्यांनी हीच का स्मार्ट सिटी असे खडे बोल पालिका आयुक्तांना सुनावले.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत केडीएमसीचा समावेश झाला असला तरी त्याच्या कामाच्या दर्जाबाबत थेट केंद्रीय मंत्र्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर असणाऱ्या केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीच रस्त्यांसह स्वच्छतेच्या मुद्द्यावरून थेट केडीएमसी प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. केडीएमसी मुख्यालयातील स्मार्ट सिटीच्या कमांड अँड कंट्रोल सेंटरला त्यांनी भेट दिली.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेमध्ये केडीएमसीचाही समावेश आहे हे ऐकल्यावर आपल्याला धक्काच बसला. बाहेरून आल्यावर इथल्या रस्त्यांची परिस्थिती बघून असे वाटत नाही की ही स्मार्ट सिटी असल्याचे सांगत त्यांनी केडीएमसी प्रशासनाचे कान उपटले. तसेच ज्या ज्या ठिकाणी स्मार्ट सिटीचे काम झाले त्या त्या ठिकाणी आपल्याला चांगला बदल पाहायला मिळाला. पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच त्यांनी शहर सौंदर्यकरणावरही विशेष लक्ष दिले आहे. समाजातील लोकांच्या सहभागाने स्वच्छता मोहीम राबवत केलेलं काम आणि इथल्या स्मार्ट सिटीच्या कामामध्ये भरपूर मोठा फरक असल्याची टिप्पणी ठाकूर यांनी यावेळी केली. तर आज जेव्हा केडीएमसी स्मार्ट सिटी योजनेमध्ये असल्याबाबत आपल्याला सांगितले ते ऐकून आपण हैराण झाल्याचेही अनुराग ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्मार्ट सिटी कामाच्या दर्जाबाबत व्यक्त केलेल्या या भावनांमुळे महानगर पालिका प्रशासनाची चांगलीच नाचक्की झाल्याचे दिसून आले.
कल्याण डोंबिवली महापालिका स्मार्ट सिटी अंतर्गत येते अस शहरांकडे बघून वाटत नाही असे सांगत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आपली नाराजी व्यक्त केली. अधिकाऱ्यांसोबत चार तास चर्चा केली तेव्हा कळले काही काही प्रकल्प हे कित्येक वर्ष सुरु आहे आणि अत्यंत धीम्या गतीने सुरू प्रकल्पाचे काम सुरु आहे हे पाहून दुःख वाटल्याचे केंद्रीय मंत्री यांनी सागितले.रस्त्यांची किवा ट्राफिकची समस्या,पिण्याच्या पाण्याची समस्या,गरिबांच्या घराचीच्या योजनाची समस्या असो यात काही आडचणी न निर्माण करता सामान्य नागरिकाच्या सुविधा मिळाल्या पाहिजे याच्या साठी समाधान झाले पाहिजे असे अधिकार्यांना चर्चेत मंत्री ठाकूर यांनी सागितले, त्याचा बरोबर हे हि म्हणाले ली मी पुन्हा दोन महिन्याने येईल तेव्हा मला यात प्रशासना कडून प्रगती झाल्याची दिसून येईल अशी अशा मी बाळगतो, मी चार तासांची बैठक घेतली पण मला यात असे आढळून आले आहे की यात काही प्रकल्प अनेक वर्ष रखडलेले आहे याचे दुख येथील अधिकारी व व्यवस्थेला नाही, असे माध्यमांशी बोलत आपली नाराजी व्यक्त केली.
यावेळी केडीएमसीचे अधिकारी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांची माहिती देत होते. त्यावेळी अधिकाऱ्याने कल्याण पश्चिम येथील काळा तलाव असा उल्लेख केला. आणि तो ऐकून सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्यांना थांबवत काळा नव्हे भगवा तलाव म्हणा असे सांगत अशी चूक पुन्हा करू नका आपली रिटायर्डमेंट आल्याचे सुनावले.