नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
धुळे/प्रतिनिधी – आमदार अपात्रता प्रकरणाचा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाचा उद्धव ठाकरे गटाने निषेध व्यक्त केला असून काळे झेंडे फडकवत उद्धव ठाकरे गटाने धुळ्यात आंदोलन केले.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा आज निकाल जाहीर करण्यात आला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा निकाल जाहीर करीत खरी शिवसेना शिंदे गटाचीच असल्याचे जाहीर केले. संपूर्ण राज्यभरात पडसाद उमटत असून उद्धव ठाकरे गटाने निषेध व्यक्त केला आहे. हा निकाल जाहीर करून विधानसभा अध्यक्षांनी लोकशाहीचा खुन केल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे गटाने व्यक्त केली आहे. धुळ्यात उद्धव ठाकरे गटाने काळे झेंडे फडकवत या निकालाचा निषेध व्यक्त केला. धुळ्यात शिवसेना कार्यालया जवळ हे आंदोलन करण्यात आले.