औरगाबाद/ प्रतिनिधी – महाराष्ट्राच्या भारूड लोककला प्रकाराला आपल्या सादरीकरणाच्या जोरावर सातासमुद्रापार पोहचवणाऱ्या सच्चा लोककलावंत आपल्याला सोडून गेला आहे, भारूड या लोककलेला निरंजन भाकरे यांनी आपल्या सादरीकरणाच्या आगळेपणातून सातासमुद्रापार पोहोचवले होते. भारुड या लोककलेला त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य अर्पण केले होते. भारूडं आधुनिक काळात लोकांना माहित करून देणारे लोककलावंत म्हणून निरंजन भारकरे यांची ओळख होती. ‘बये तुला बुरगुंडा होईल गं’ या भारुड सादरीकरणाने राज्यभर प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ लोककलावंत निरंजन भाकरे यांचे काल दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी त्यांचे निधन झाले आहे. ते ६२ वर्षाचे होते. त्याच्या नंतर पत्नी,मुलगा,सुन व नातवंडे असा परिवार आहे.
ग्रामीण भागातील, सामान्य कुटुंबातील या अस्सल कलाकाराने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भारुड सादरीकरणामुळे सर्वांच्या मनात घर केले होते. भारुड आणि इतर लोककलांचे जतन – संवर्धन व्हावे, म्हणून त्यांनी कायम पुढाकार घेतला. नवीन कलाकार घडावे त्या साठी ते नेहमी सक्रीय असत त्यांचे काम रसिकजनाच्या कायम स्मरणात राहील.निरंजन भाकरे यांच्या निधनाने लोककलेची मोठी हानी झाली आहे.
Related Posts
-
मेळघाटच्या राख्या सातासमुद्रापार ; पर्यावरण पूरक राख्यांची निर्मिती
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती / प्रतिनिधी - अमरावती जिल्ह्यातील…
-
लोककलावंत छगनराव चौगुले यांची लोकगीतं हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली
प्रतिनिधी . मुंबई, दि. २१ :- लोककलावंत छगनराव चौगुले यांच्या…